Milind Narvekar Property : उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती!

306
Milind Narvekar Property : उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती!
Milind Narvekar Property : उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती!

लोकसभा निवडणूक, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या असून आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका १२ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी उमेवारी अर्ज दाखल केला आहे. मिलिंद नार्वेकर हे दहावी पास असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातून उघड झाले आहे. (Milind Narvekar Property)

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्याकडून मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी अर्ज सादर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्ती, शिक्षण व त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती दिली आहे. (Milind Narvekar Property)

पत्नीकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

नार्वेकर यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांचे शिक्षण हे १० वी झाले आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. नार्वेकर यांच्या कडे ४५ हजार रुपये रोख तर त्यांच्या पत्नीकडे ३६ हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात ७४ लाख १३ हजार २४३ रक्कम तर पत्नीच्या बँक खात्यात ८ कोटी २२ लाख ११८ ऐवढी रक्कम आहे. नार्वेकर यांनी बॉण्ड्स आणि म्युचल फंडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यांनी ५० तर त्यांच्या पत्नीने १२ कोटी ४० लाख ८२ हजार ५२६ कोटी रुपये बॉन्ड आणि म्युचुयल फंडमध्ये गुंतवले आहे. तर पोस्ट ऑफिस व पॉलिसीमध्ये देखील मिलिंद नार्वेकर यांनी ३ लाख ६८ हजार ७२९ रुपये गुंतवले आहे. तर त्यांच्या पत्नीचे ६७ लाख ८८ हजार ५५८ रुपये गुंतवले आहेत. (Milind Narvekar Property)

पत्नीच्या नावावर अलिबाग येथे फार्म हाऊस

मिलिंद नार्वेकर यांच्या मालकीची कोकण व बीडमध्ये जमीन आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड (तालुका दापोली) येथे ७४.८० एकर जमीन आहे. यात त्यांच्या पत्नीचा ५० टक्के वाटा आहे. तर बीड जिल्ह्यात बाणेवाडी येथे ०.१९ एकर जमीन आहे. आणि बंगळूर येथे त्यांच्या पत्नीच्या नावावर २३२५ स्क्वेअर फूट जमीन आहे. तर मुंबईत मालाड व बोरिवली येथे १००० स्क्वेअर फुटाचे घर असून पत्नीच्या नावावर अलिबाग येथे फार्म हाऊस आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ४ कोटी १७ लाख ६३ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे ११ कोटी ७४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. (Milind Narvekar Property)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.