- ऋजुता लुकतुके
२०२५ सालची चॅम्पियन्स (Champions Trophy 2025) करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणं प्रस्तावित आहे. ती ठरल्याप्रमाणे पार पडावी यासाठी पाकिस्तानचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. इतर देशांनी पाकिस्तानच्या यजमानपदाला विरोध केलेला नाही. पण, भारताने मात्र अजूनही पाकिस्तानमध्ये खेळणार की नाही यावर स्पष्ट मत दिलेलं नाही. असं असताना बुधवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना १ मार्चला लाहोर इथं आयोजित केला आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)
ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये व्हायची आहे. पाक बोर्डाने अध्यक्ष मोहसीन नकवी हे टी-२० विश्वचषकासाठी बार्बाडोसला होते. तिथे आयसीसी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक आयसीसीच्या मान्यतेसाठी त्यांच्याकडे सोपवलं आहे. यात १५ सामन्यांचा समावेश आहे. भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणावरुन फक्त लाहोरमध्ये ठेवले आहेत. (Champions Trophy 2025)
‘पीसीबीने (PCB) १५ सामन्यांचं वेळापत्रक आयसीसीला सादर केलं आहे. रावळपिंडी, कराची आणि लाहोर या तीन ठिकाणी सामने प्रस्तावित आहेत. संघांची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे,’ असं आयसीसीमधील (ICC) सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Milind Narvekar Property : उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती!)
पाकिस्तानमध्ये श्रीलंकन क्रिकेट संघ (Sri Lanka Cricket Team) असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. उभय देशांमध्ये सीमेवरून असलेल्या वादांमुळे केंद्रसरकारच्या किंवा परराष्ट्र व्यवहार खात्याच्या परवानगीशिवाय भारतीय नागरिकांना पाकिस्तानला जाता येत नाही. (Champions Trophy 2025)
त्यामुळे बीसीसीआयने अजूनही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) भारत सहभागी होणार का यावर स्पष्टता दिलेली नाही. २०२३ च्या आशिया चषकाचं आयोजन पाकिस्तानमध्ये झालं होतं. पण, भारताने खेळायला नकार दिल्यावर भारताचे सामने श्रींलकेत झाले. यावेळी मात्र पाकिस्तानने देशाबाहेर सामने हलवायला नकार दिला आहे. आणि भारताला खेळण्यास भाग पाडावं यासाठी आयसीसीला गळ घातली आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- RRR चित्रपटात राम चरणने ज्यांची भूमिका साकारली, ते Alluri Sitarama Raju कोण होते?)
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित होत नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं उत्पन्न कमालीचं घटलं आहे. आणि आर्थिक स्थितीला उभारी आणण्यासाठी त्यांना स्पर्धा आयोजनाची गरज आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community