उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील जनतेसाठी एक संदेश देणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
अजित पवार यांनी व्हिडिओमध्ये म्हंटले आहे की, ”काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडण्याचे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात महिन्याला १५०० जमा केले जाणार आहेत. माता भगिणी सशक्त आणि स्वावलंबी होण्यासाठी ही योजना आहे.” असे ते म्हणाले. (Ajit Pawar)
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !#दादाचा_वादा pic.twitter.com/JOlKJZMxYY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2024
”या अर्थसंकल्पावर अनेक लोक अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून वाईट असल्याचे सांगितले जात आहे. काहींनी लबाडाच्या घरच आवतान म्हणून हिणवले जात आहे. मला इतकेच सांगायचे आहे की या लोकांमध्ये आणि अजित दादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे. बजेटवर नाक मुरडणाऱ्यांचे चेहरे आजच बघून घ्या,” असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. (Ajit Pawar)
माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही…
”मी राजकारणात आल्यापासून कोणता पक्ष बदलला नाही. पार्टी बदलली नाही. राजकारणात आल्यापासून जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जनतेच्या हिताचाच विचार करतो. मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप झाले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. जो जास्त काम करतो त्याला जास्तीचा विरोध होतो.” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community