T20 Champions Return Home : भारतात परतल्यावर रोहित, सूर्यकुमारचा भांगडा; खेळाडू आता पंतप्रधानांच्या भेटीला

T20 Champions Return Home : गुरुवारी पहाटे भारतीय संघ नवी दिल्लीत अखेर दाखल झाला

132
T20 Champions Return Home : भारतात परतल्यावर रोहित, सूर्यकुमारचा भांगडा; खेळाडू आता पंतप्रधानांच्या भेटीला
T20 Champions Return Home : भारतात परतल्यावर रोहित, सूर्यकुमारचा भांगडा; खेळाडू आता पंतप्रधानांच्या भेटीला
  • ऋजुता लुकतुके 

अखेर भारतीय संघ गुरुवारी पहाटे नवी दिल्लीत पोहोचला. बुधवारचा अख्खा दिवस फ्लाईटट्रॅकर वेबसाईटवर भारतीय संघाला नवी दिल्लीत घेऊन येणारं विमानच सर्वाधिक ट्रॅक होत होतं. म्हणजे ते कुठे आहे आणि कधी पोहोचणार हे तपासलं जात होतं. लाखो लोकांनी बुधवारी या सेवेचा लाभ घेतला. इतकी उत्सुकता भारतीय चाहत्यांना होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीय खेळाडू इंदिरा गांधी विमानतळावर उतरले. थोड्या वेळातच आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे पावसाची रिपरिप असताना चाहत्यांनी गर्दी केली होती. स्वागताला पंजाबी ढोल आणि नर्तकही होते. (T20 Champions Return Home)

(हेही वाचा- Upendra Dwivedi : जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा लष्करप्रमुखांकडून आढावा!)

माहौलच असा होता की, कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) मोह आवरला नाही. तोही तालावर थोडावेळ थिरकला. विमानतळापासूनच रोहितने विश्वचषक उंचावून तो चाहत्यांना दिसेल असा उंच हातात धरला होता.  (T20 Champions Return Home)

त्यानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये आत गेला. तर तिथे कर्मचारी वर्गाने जर्सीचा रंग असलेला निळ्या रंगाचा केक बनवला होता. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी हा केक कापला. कर्मचारी वर्गाचं अभिनंदन स्वीकारलं. (T20 Champions Return Home)

 तिथून बरोबर साडेअकरा वाजता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीसाठी जनकल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाला. इथं पंतप्रधानांनी भारतीय संघाला अल्पोपहाराचं निमंत्रण दिलं आहे. पंतप्रधानांबरोबर दोन तास घालवून भारतीय संघाची बस पुन्हा हॉटेलला रवाना झाली. (T20 Champions Return Home)

 दुपारीच भारतीय संघ नवी दिल्लीहून मुंबईसाठी रवाना होणार आहे. तिथे संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारतीय संघाची भव्य मिरवणूक ओपन एअर बसमधून काढण्यात येणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखडे स्टेडिअम अशी ही मिरवणूक निघेल. त्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कारण, या सोहळ्यासाठी मुंबई बाहेरुनही हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. वानखेडे स्टेडिअमवर संघाचा सत्कार समारंभ होणार आहे. (T20 Champions Return Home)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.