- सुजित महामुलकर
राज्याच्या विधानसभेत जनतेच्या प्रश्नावर चर्चा होतेच. पण गुरुवारी ४ जुलैला चक्क पेट्या देण्या-घेण्यावर चर्चा झाली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. (Legislative Council Elections)
पुढच्या आठवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि त्याच दिवशी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. (Legislative Council Elections)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : पीसीबीने जाहीर केलं चॅम्पियन्स करंडकाचं वेळापत्रक, भारत वि पाक सामना १ मार्चला प्रस्तावित)
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
काहीवेळा ही निवडणूक बिनविरोध होते. मात्र यावेळी ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक होणार, अशी चिन्हे आहेत. उद्या ५ जुलै उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. (Legislative Council Elections)
मिलिंद नार्वेकर प्रथमच निवडणूक रिंगणात
महायुतीने म्हणजेच भाजपा (BJP), शिवसेना (Shiv Sena), अजित पवार यांची राष्ट्रवादी (NCP) यांनी आपले आमदार संख्या लक्षात घेऊन ९ उमेदवार दिले. त्यात भाजपाचे (BJP) ५, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रत्येकी २ आहेत. तर महाविकास आघाडीने दोन उमेदवार निवडून येतील इतके संख्याबळ असूनही तीन उमेदवार उतरवले. त्यात काँग्रेसकडून (Congress) प्रज्ञा सातव (Pradnya Satav), शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू, शिवसेना उबाठाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हेदेखील प्रथमच निवडणूकीत उतरले आहेत. (Legislative Council Elections)
त्यामुळे या निवडणूकीत अपक्ष आमदार आणि ‘पेट्या’ यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. विधिमंडळ परिसरातच नाही, तर विधानसभेतही पेट्यांवर चर्चा झाली. (Legislative Council Elections)
प्रश्न घ्या
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांनी ‘राज्यातील शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये “टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग” यंत्रणा कार्यान्वित करणेबाबत’चा प्रश्न उपस्थित केला. त्यांचा प्रश्न लांबत चालल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘प्रश्न घ्या’ असे सांगत प्रश्न थोडक्यात मांडण्याची सूचना केली. (Legislative Council Elections)
(हेही वाचा- T20 Champions Return Home : भारतात परतल्यावर रोहित, सूर्यकुमारचा भांगडा; खेळाडू आता पंतप्रधानांच्या भेटीला)
‘रोहितदादा सगळ्यांकडे पेट्या पाठवतात’
त्यावर प्रतिक्रिया देताना जोरगेवार म्हणाले, “प्रश्न घेतो ना. अपक्षांच्या बाबतीत असं काय करता? रोहितदादाला (रोहित पवार) (Rohit Pawar) बोलू दिले नाही. खरं तर रोहितदादाला बोलू द्यायला पाहिजे होतं. ते पेट्या पाठवतात सगळ्यांकडे .. आंब्याच्या पेट्या.. त्यांना बोलू दिले नाही. मी अपक्ष आहे. मला तर बोलू द्या. १२ तारखेला पुन्हा बोलायलाच लागणार आहे मला.. १२ तारखेसाठी किती लोक बोलत आहेत… पण सभागृहात बोलू देत नाही तुम्ही.. “ (Legislative Council Elections)
‘दुसऱ्या ‘पेट्या’ही चलतील, अडचण नाही’
इतके बोलताच बसलेल्या अन्य आमदांमधून एक आवाज आला, “पेट्या कशाच्या ते सांगा.” त्यावर जोरगेवार म्हणाले, “आंब्याच्या पेट्या.. दुसऱ्या पेट्या पाठवल्या तरी चालेल ना.. आम्हाला काही अडचण नाही..” आणि सभागृहात एकच हशा पिकला. मात्र, यानिमित्ताने निवडणूक, अपक्ष आणि पेट्या याचा काहीतरी संबध असल्याचे अधोरेखित झाले. (Legislative Council Elections)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community