शंभर दिवसाच्या अजेंड्यावर काम करीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने बुधवारी उशिरा विविध स्थायी समित्यांची घोषणा केली. या समित्या त्या त्या मंत्रालयाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. महत्त्वाचे म्हणजे या समित्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. (Modi Govt)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने बुधवारी (३ जुलै) सुरक्षा, आर्थिक व्यवहार आणि राजकीय घडामोडींशी संबंधित कॅबिनेट समित्यांची स्थापना केली. या समित्या देशाच्या सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय विषयांशी संबंधित मोठे निर्णय घेतात. या समित्यामध्ये भाजपाच्या मंत्र्यांव्यतिरिक्त रालोआतील घटक पक्षांनाही स्थान देण्यात आले आहे. यात बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा जेडीएस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आणि लोक जनशक्ती पार्टी-रामविलास (एलजेपी-आर) या मंत्र्यांचाही या समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आताचे मोदी सरकार हे रालोआचे असल्यामुळे या समित्यात घटक पक्षांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गृहमंत्री अमित शहा प्रत्येक समितीत आहेत. (Modi Govt)
सुरक्षा संबंधित समिती : यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा समावेश आहे. (Modi Govt)
आर्थिक विषयक समिती : पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारमण, एस जयशंकर, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी (JDS) यांचा समावेश आहे. या समितीत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह (JDU) यांचाही समावेश आहे. (Modi Govt)
राजकीय घडामोडींवरील मंत्रिमंडळ समिती : राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारमण, लालन सिंग, जेपी नड्डा, सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू (टीडीपी), आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराव, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांचा समावेश आहे. त्यात कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचाही समावेश करण्यात आला आहे. (Modi Govt)
(हेही वाचा – Vasant More उद्धव ठाकरेंना साथ देणार? ‘मातोश्री ‘ वर भेट घेणार!)
उत्तर प्रदेश – नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, जयंत चौधरी, जितिन प्रसाद, पंकज चौधरी, बी एल वर्मा, अनुप्रिया पटेल, कमलेश पासवान, एसपी सिंह बघेल, किर्तिवर्धन सिंह
बिहार – चिराग पासवान, गिरिराज सिंह, जीतन राम मांझी, रामनाथ ठाकुर, ललन सिंह, नित्यानंद राय, राजभूषण चौधरी, सतीश दुबे
महाराष्ट्र – पीयूष गोयल, नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ
गुजरात – अमित शहा, एस जयशंकर, मनसुख मांडविया, सी. आर. पाटील, निमुबेन बंभानिया
कर्नाटक – निर्मला सितारमण, एचडी कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, वी सोमन्ना
मध्य प्रदेश – शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, सावित्री ठाकुर, वीरेंद्र कुमार खटीक, दुर्गा दास उइके
राजस्थान – गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, भूपेंद्र यादव, भगीरथ चौधरी
ओडिशा – अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, जुएल ओराव
हरियाणा – एम. एल. खट्टर, राव इंद्रजीत सिंह, कृष्णपाल गुर्जर
झारखंड – संजय सेठ, अन्नपुर्णा देवी
पश्चिम बंगाल – शांतनू ठाकुर, सुकांत मजुमदार
तेलंगणा – जी किशन रेड्डी, बंदी संजय कुमार
आसाम – सर्बानंद सोनोवाल, पवित्रा मार्गरीटा
केरळ – सुरेश गोपी, जॉर्ज कुरियन
बाकी उर्वरित राज्यांतील एक-एक मंत्री – हिमाचलहून जेपी नड्डा, गोव्यातून श्रीपद येसो नाईक, जम्मू काश्मीरहून जितेंद्र सिंह, अरुणाचल प्रदेशहून किरेन रिजिजू, तामिळनाडूतून एल. मुरुगन, छत्तीसगडमधून तोखन साहू, पंजाबहून रवनीत सिंह बिट्टू, उत्तराखंडहून अजय टम्टा, दिल्लीहून हर्ष मल्होत्रा यांचाही समावेश आहे. (Modi Govt)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community