Wayanad Tourist Places : वायनाड एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ; वायनाडमधील सौंदर्य स्थळांची करुया सफर

113
Wayanad Tourist Places : वायनाड एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ; वायनाडमधील सौंदर्य स्थळांची करुया सफर

वायनाड हे केरळ इथले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. निलगिरी पर्वताच्या कुशीत आणि घनदाट जंगलांमध्ये वसलेलं हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी तसेच छायाचित्रकारांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. (Wayanad Tourist Places)

तुम्हाला जर केरळमधलं खरं निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर तुम्ही वायनाडला नक्कीच भेट द्यायला हवी. आम्ही तुम्हाला वायनाडच्या अशा काही पर्यटन स्थळांची माहिती सांगणार आहोत, जिथे जाऊन तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं स्वर्गसुख उपभोगू शकता. चला तर मग पाहुयात… (Wayanad Tourist Places)

सुचिपरा धबधबा

सुचिपरा धबधबा हा घनदाट आणि हिरव्यागार जंगलाच्या मधोमध आहे. सुचिपरा धबधब्याची उंची दोनशे फूट एवढी आहे. या धबधब्याला सेंटिनल रॉक वॉटरफॉल असंही म्हणतात. मेप्पडी येथून या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त वीस मिनिटं लागतात. पार्किंगच्या ठिकाणापासून या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटर एवढं अंतर चालायला लागतं. तुमच्या मनःशांतीसाठी आणि शरीराचा थकवा घालवण्यासाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. (Wayanad Tourist Places)

पूकोडे सरोवर

वायनाड इथलं हे गोड्या पाण्याचं सरोवर एकदिवसीय सहलीसाठी अगदी उत्तम ठिकाण आहे. हे सरोवर चारही बाजूंनी घनदाट आणि हिरव्याजर्द जंगलांनी वेढलेलं आहे. या सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी भिंत वाट दाखवते. जंगलातून त्या हिरवळीच्या भिंतीच्या दिशेने चालत जाऊन तुम्ही या सरोवरापर्यंत पोहोचू शकता.

हे सरोवर पणमारं नाल्याशी जोडलं गेलेलं आहे. पुढे जाऊन या नाल्याचं काबानी नावाच्या मोठ्या नदीमध्ये रूपांतर होतं. या सरोवराच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात तुम्ही छान वेळ घालवू शकता. (Wayanad Tourist Places)

नीलिमा व्ह्यू पॉईंट

ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी हे पर्यटन स्थळ पाहणं कधीच चुकवू नये. नीलिमा व्ह्यू पॉईंट इथून तुम्हाला खोल दरीतलं चित्तथरारक आणि विहंगम दृश्य पाहता येतं. निलगिरी पर्वताच्या उतारावरून ट्रेकिंग करून या नीलिमा व्ह्यू पॉईंटपर्यंत पोहोचता येतं. जर तुम्हाला ट्रेकिंगची सवय नसेल तर हा ट्रेक तुम्हाला थोडा अवघड वाटू शकतो. पण जर तुम्ही खरे पर्यटक असाल तर कुठलंही कारण तुम्हाला रोखू शकणार नाही. (Wayanad Tourist Places)

मिनमुट्टी धबधबा

वायनाडमधल्या दोन धबधब्यांपैकी हा दुसरा धबधबा आहे. हा धबधबा कलपेट्टापासून एकोणतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा धबधबा तीन स्तरांचा आहे, त्याची उंची तीनशे मीटर एवढी आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला वायनाड-उटी रोडने दोन किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. ज्या लोकांना ट्रेकिंगची आवड आहे, त्या लोकांसाठी हे पर्यटन स्थळ फिरणं रोमांचक असेल. याव्यतिरिक्त पक्षीनिरीक्षण करण्यासाठी आणि नेचर फोटोग्राफीसाठी मिनमुट्टी धबधबा हे ठिकाण अतिशय योग्य आहे. (Wayanad Tourist Places)

(हेही वाचा – Crime News : पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, घाबरून पळ काढला आणि ६ जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू !)

थोलपट्टी वन्यजीव अभयारण्य

वायनाडच्या पर्यटन स्थळांची यादी या थोलपट्टी अभयारण्याला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. इथली घनदाट हिरवीजर्द जंगलं, सुंदर टेकड्या आणि इथलं संपूर्ण वातावरण वेगवेगळ्या प्रजातींच्या वन्य प्राण्यांना राहण्यासाठी अतिशय पोषक आहे. इथल्या जंगलामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्राणी-पक्षी मुक्तपणे वावरताना दिसतात. या अभयारण्यात तुम्हाला वाघ, बिबट्या, हत्ती, हरीण, अस्वल, माकडे यांसारखे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी तसेच विविध प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती तुम्हाला जवळून पाहण्याची संधी मिळते. (Wayanad Tourist Places)

कर्लाड लेक

कर्लाड लेक हे वायनाड पर्यटन स्थळांच्या यादीतलं एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे एक शांत छटा असलेलं अतिशय सुंदर तलाव आहे. हंगामात हे तलाव सुंदर वॉटर लिलीच्या फुलांच्या चादरीने आच्छादलेलं असतं. या तलावात छोटे मासे आणि प्राणी राहतात. तलावाच्या आसपास तुम्हाला वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात कर्लाड तलावाला तुम्ही भेट देऊ शकता. इथलं प्रवेश शुल्कही कमी आहे. (Wayanad Tourist Places)

लक्किडी व्ह्यू पॉईंट

लक्किडी हा थामरसेरी घाटाच्या खिंडीवरचा वायनाडला जाणारा रस्ता आहे. या रस्त्याचा सापासारखा वळणावळणाचा दिसणारा आकार या लक्किडी व्ह्यू पॉईंटच्या उंचावरून खूप नयनरम्य दिसतो. या सुंदर डोंगरांच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. या ठिकाणी पर्यटक विकेंडची मजा घ्यायला आणि निसर्गाचा आनंद लुटायला येतात. (Wayanad Tourist Places)

पक्षीपठलम बर्ड सेंच्युरी

पक्षीपठलम बर्ड सेंच्युरी हे पक्षी अभयारण्य विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंदही घेऊ शकता. वाटेत तुम्हाला अनेक ओढे, डोंगर आणि नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं. तुम्हाला पक्षीनिरीक्षणाची आवड असेल तर तुम्ही वायनाडमधल्या या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या. (Wayanad Tourist Places)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.