Drugs Case: Lalit Patil ड्रग्ज प्रकरण; दोन पोलिसांची हकालपट्टी    

135
Drugs Case: Lalit Patil ड्रग्ज प्रकरण; दोन पोलिसांची हकालपट्टी    
Drugs Case: Lalit Patil ड्रग्ज प्रकरण; दोन पोलिसांची हकालपट्टी    

ससून रुग्णालयातून अमली पदार्थाचे रॅकेट (Sassoon drug racket) चालविणारा अमली पदार्थ माफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. या प्रकरणात पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन अगोदर करण्यात आले होते. (Lalit Patil) 

(हेही वाचा – मुंबईला मिळणार नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय; Rahul Narvekar यांच्या प्रयत्नांना यश)

बडतर्फ दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर

पोलीस हवालदार आदेश शिवणकर (Adesh Shivankar) आणि पिराप्पा बनसोडे (Pirappa Bansode) अशी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे पोलीस मुख्यालयातील या दोन्ही कर्मचाऱ्यांना आता सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. जर नियंत्रण कक्षाला माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटीलला पकडता आले असते. परंतु या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षाला कळवले नाही. असे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. 

ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा ठपका या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर  ठेवण्यात आला आहे. चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यात ससून हॉस्पिटलमधील (Sassoon Hospital) कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह १५ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. (Lalit Patil)

ललित पाटील प्रकरणी तब्बल ३१५० पानांचे चार्जशीट

ललित पाटील  (Lalit Patil)  प्रकरणात अनेल खुलासे (Lalit Patil Drugs Case) समोर येत आहे. ललित पाटील आणि त्याच्यासह १५ जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल ३१५० पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केलं. 

(हेही वाचा – ग्रंथालयांना अनुदान देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय ? Pravin Darekar यांचा सवाल)

काय होते प्रकरण

पुणे शहरात घडलेल्या या प्रकरणामुळे राज्यात काही महिन्यांपूर्वी खळबळ माजली होती. ड्रग्स माफिया असलेला ललित पाटील एका ड्रग्स प्रकरणात पुणे येथील येरवडा कारागृहात होता. परंतु तो कारागृहात न राहता महिनोमहिने ससून रुग्णालयात मुक्काम ठोकत होता. त्यानंतर रुग्णालयातून हवे तेव्हा तो हॉटेलमध्ये जात होता. त्याची चांगली बडदास्त पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ठेवली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर तो ससून रुग्णालयातून फरार झाला होता. (Lalit Patil)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.