मुंबई शहरामध्ये महानगर पालिका, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून रूग्णालये कार्यरत आहेत. या रूग्णालयांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी शासन गंभीर असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी (४ जुलै) विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिली. यासंदर्भात सदस्य कॅ. तमील सेल्वन यांनी लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. (Assembly Session)
अधिकची माहिती देताना मंत्री सामंत (Uday Samant) म्हणाले, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय अर्थात सायन रूग्णालयाचा पुर्नविकास दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६१६ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कार्यादेश देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाचे १५०७ कोटी रूपयांची निवीदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयाच्या व्यतिरिक्त नवीन जागेवर रूग्णालय बांधण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले रूग्णालय सुरूच राहणार आहे. सायन रूग्णालयातील बाह्य रूग्ण विभागात दररोज ७ हजार रूग्णांची नोंदणी होते. (Assembly Session)
(हेही वाचा – झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार; Atul Save यांची माहिती)
मंत्री सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले, सायन रूग्णालयात १००० कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ३०० वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व ४५० परिचारिका कार्यरत आहे. त्याशिवाय १५० परिचारिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार रूग्णालयात डॉक्टरांची संख्या आहे. रूग्णालयास आवश्यक औषधांचा पुरवठा मध्यवर्ती खरेदी खात्यातून करण्यात येतो. यासाठी पालिका स्तरावर निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तोपर्यंत जुन्या कंत्राटदारांकडून पुर्वीच्याच दराने औषधांची पुरवठा करण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया लांबण्याबाबत चौकशी करण्यात येईल. नायर रूग्णालयातील दोन सी. टी स्कॅन यंत्र खरेदी करण्याबाबत आदेश देण्यात येतील. ज्या भागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून बंद करण्यात आला असेल, सुविधा पुरविण्यात आल्या नसतील अशा ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल. केईएम रूग्णालयाला १०० वर्ष होत आहे. या रूग्णालयाच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. (Assembly Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community