भारतीय टी-२० (Indian T20 Team) विश्वचषक विजेता संघ (World Cup winning team) गुरुवारी (४ जुलै) रोजी भारतात परतले आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे (T20 World Cup) जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ वादळामुळे काही दिवस बार्बाडोसमध्ये होता. बीसीसीआय (BCCI) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे भारतीय संघ चार्टर्ड फ्लाइटद्वारे गुरुवारी दिल्लीत पोहोचले. दरम्यान, टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.
(हेही वाचा – सागरी सुरक्षेसाठी पोलिस दलातील पद भरती प्रक्रिया तातडीने करणार; DCM Devendra Fadnavis यांची माहिती)
दिल्लीत पोहोचल्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. प्रथम संघ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर रोहित शर्मा आणि संपूर्ण संघ मुंबईला रवाना झाले. संध्याकाळी ५ वाजल्यापासून मुंबईत रोड शो होणार होते. त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर हा संघ या विजयाचा जल्लोष करणार असून तिथे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Team India चे भर पावसात क्रिकेटप्रेमींकडून स्वागत; वानखेडे स्टेडियममध्ये जोरदार सेलिब्रेशनची तयारी )
टीम इंडियाची विजयी यात्रा सुरू झाली
मरीन ड्राईव्ह येथून विजयी मिरवणूक निघाली असून टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य ट्रॉफीसह खुल्या बसमध्ये चढले. मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून तिथे उपस्थित लोक रोहितसह कोहलीच्या घोषणा देत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचे खेळाडू मरीन ड्राइव्हवर चाहत्यांना विजयी रथाचा आनंद देत आहेत. मरीन ड्राईव्हवर चाहत्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कटआउट्स हातात घेत जल्लोष करत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community