Team India Victory Parade : बेस्टची ओपन बस का वापरली नाही भारताच्या विजयी रॅलीसाठी, जाणून घ्या!

917
Team India Victory Parade : बेस्टची ओपन बस का वापरली नाही भारताच्या विजयी रॅलीसाठी, जाणून घ्या!

भारताच्या विजयी संघाच्या मुंबईतील रॅलीसाठी वापरण्यात आलेल्या बसेसवरून वातावरण तापले असून ही बस गुजरातची असल्याने बेस्टची बस का वापरली नाही असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, बेस्टच्या ताफ्यात असलेल्या विभावरी आणि निलांबरी या दोन्ही ओपन डेक बसेस आरटीओच्या नियमानुसार मागील वर्षीच कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताब्यातच ओपन डेक बसेस नसल्याने मुंबई क्रिकेट संघाला गुजरातमधील ओपन डेक बसेसचा वापर करावा लागला. त्यामुळे माहिती न घेता आरोप करणारे विरोधकच तोंडावर आपटले गेले आहेत. (Team India Victory Parade)

सन २०११ मध्ये भारताला विश्वचषक निवडून देणाऱ्या भारतीय संघाचे मुंबईत जोरदार स्वागत करत बेस्टच्या विभावरी आणि निलांबरीमधून रॅली काढण्यात आली होती. या घटनेची आठवण पुन्हा एकदा मुंबईकरांना झाली असून टी २० चॅम्पियन चषक विश्वचषक विजेत्या संघाचे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सायंकाळी मुंबईत आगमन झाले. विमानतळ ते मरीन ड्राईव्हपर्यंत वातानुकूलित बसमधून आणि त्यानंतर ओपन डेकमधून कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह क्रिकेटपटुंची रॅली निघाली. (Team India Victory Parade)

(हेही वाचा – Assembly Session : मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणार)

या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी रॅलीसाठी वापरण्यात येणारी ओपन डेक बस ही गुजरातमधून आणली गेल्याने काँग्रेसचे नाना पटोल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी जोरदार टिका करत यासाठी बेस्टची बस का घेतली नाही असा सवाल केला. सन २०११च्या चॅम्पियन ट्रॉपी विजेत्या भारतीय संघाच्या मुंबईतील विजयी रॅलीसाठी वापरण्यात आलेल्या निलांबरी बस ही मागील वर्षी ऑगस्टमध्ये १५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाली. तर विभावरी बस यापूर्वीच सेवा निवृत्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही बसेस सध्या बेस्टच्या ताफ्यात नसून या दोन्ही ओपन डेकच्या बदल्याने बेस्टच्या ताफ्यात १० वातानुकूलित ओपन बस खरेदी करण्याची घोषणा बेस्ट उपक्रमाने केली होती. (Team India Victory Parade)

बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांच्याशी याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सध्या बेस्टच्या ताफ्यात विभावरी आणि निलांबरी या दोन्ही ओपन बसेस नसून मागील वर्षीच निलांबरी ओपन बस सेवा निवृत्त झाली आहे. मुख्य म्हणजे या दोन्ही बसेस एमटीडीसीच्या मालकीच्या असून बेस्टच्यावतीने या बसेस चालवण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयी रॅलीसाठी गुजरातमधून ओपन बस मागवण्यात आली आहे. परंतु विरोधकांना गुजरात दिसले की करा आरोप असेच झाले असून जर त्यांनी बेस्टकडून याची माहिती जाणून घेतली असती तर बरे झाले. परंतु ज्या पक्षाचे नेतेच असे आहेत, त्याचे पदाधिकारी कसे असतील असा सवाल करत गणाचार्य यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (Team India Victory Parade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.