Electricity Theft : अनधिकृत फेरीवाल्यांकडून वीज चोरी; दादर, भायखळा, चेंबूर, मुलूंड, बोरिवली, अंधेरी परिसरातील वीज जोडण्या खंडित

1688
Electricity Theft : अनधिकृत फेरीवाल्यांकडून वीज चोरी; दादर, भायखळा, चेंबूर, मुलूंड, बोरिवली, अंधेरी परिसरातील वीज जोडण्या खंडित

मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेच्यावतीने कारवाईची मोहिम मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी विजेच्या खांब्यांवरून वीज चोरी करण्याच्या उद्देशाने अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी ४ जुलै २०२४ दादर रेल्वे स्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करताना या अनधिकृत वीज जोडणी खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे व्यवसाय मांडलेल्या फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात साधनसामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. (Electricity Theft)

(हेही वाचा – Hindustan Post Impact : दादरमधील वीज चोरी बेस्टने पकडली, विजेच्या वायर केल्या जप्त)

New Project 2024 07 04T205318.278

दादरमधील फेरीवाल्यांकडून बेस्टच्या खांबांमधून विजेची चोरी करून व्यावसायाकरता दिवा बत्तीची सुविधा करून घेत असल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने सर्व प्रथम देत हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आणून दिला होता. या वृत्तानंतर बेस्ट आणि महापालिकेने सर्वप्रथम विजेच्या जोडण्यात खंडित करण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांत पुन्हा ही वीज चोरी होत असल्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’ने ही बाब पुन्हा छायाचित्रासह निदर्शनास आणून दिल्यांनतर बेस्टच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वत: दादरमधील या कारवाईची पाहणी केली होती. (Electricity Theft)

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. (Electricity Theft)

New Project 2024 07 04T205430.382

(हेही वाचा – Hindusthan Post Impact : दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील चोरीच्या वीज जोडण्यांवर  पुन्हा कारवाई,  कनेक्शन पुन्हा तोडले)

मुंबईकरांची सोय व्हावी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ६१ (न) नुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सुस्थितीत ठेवणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. यानुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्ती करण्यात आली आहे. मात्र याच वीज खांबांवरून संबंधित अनधिकृत फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतल्याचे समोर आले आहे. या जोडणीवर हे विक्रेते मोठमोठे दिवे, प्रखर झोताचे दिवे लावत असल्याचे समोर आले आहे. शहर विभागात बेस्टकडून तर उपनगरांमध्ये अदानी एनर्जी लिमिटेड या वीज कंपनीकडून वीज पुरविली जाते. (Electricity Theft)

अनधिकृत फेरीवाल्यांनी जेथे अतिक्रमण करून व्यवसाय थाटला होता, तेथून जवळच असलेल्या वीज खांब्यावरून, जोडणी पेटीतून (कनेक्शन बॉक्स) अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महानगरपालिकेचे पथक आणि मे. अदानी एनर्जी लिमिटेड यांच्या पथकाने संयुक्तरित्या या फेरिवाल्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्या अनधिकृत वीज जोडण्याही काढून टाकण्यात आल्या. या धडक कारवाईत महानगरपालिका, बेस्ट आणि वीज कंपनीच्या पथकांनी सहभाग घेतला. यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तसेच अनधिकृतरित्या वीज जोडणी घेणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे. (Electricity Theft)

New Project 2024 07 04T205534.734

(हेही वाचा – Electricity Theft : दादरमध्ये खुलेआम वीज चोरी, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलाय का फेरीवाल्यांना मोफत वीज वापराचा परवाना?)

विशेष पथकांद्वारे सुरू राहणार कारवाई

अनधिकृतपणे वीज चोरी करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत महानगरपालिका प्रशासन बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाला पत्राद्वारे कळविणार आहे. असे प्रकार रोखण्यासाठी बेस्टने मोहीम हाती घ्यावी. तसेच अशा फेरीवाल्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याबाबतही महानगरपालिकेकडून कळविण्यात येणार आहे. महानगरपालिकेतील सर्व विभाग कार्यालयांतही विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात सहायक अभियंत्यांचा समोवश असणार आहे. हे पथक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात, वीज चोरांविरोधात कठोर कारवाई करणार आहे. (Electricity Theft)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.