पोलीस (Police) भरती दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर चौघांना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी मुंबईतील एसआरपीएफ कॅम्पमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रिये दरम्यान ही घटना घडली असून प्रेम ठाकरे आणि अक्षय बिराडे असे मृताचे नावे आहेत. प्रेम ठाकरे याचे बुधवारी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचरा दरम्यान मृत्यु झाला.
राज्यभरात पोलीस (Police) भरती प्रक्रिया सुरू आहे, मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी गुरुवारी पार पडली. नवी मुंबई पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रिया शिळफाटा येथील एसआरपीएफ कॅम्पमध्ये सुरू आहे. भरती मोहिमेसाठी शारीरिक चाचणी देताना एका २५ वर्षीय अक्षय बिराडे आणि इतर पाच उमेदवारांना चक्कर आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी धुळ्यातील प्रेम ठाकरे यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना निधन झाले.
(हेही वाचा Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहते रस्त्यावर, पोलिसांवरील ताण वाढला)
अभिषेक सेटे (२४), सुमित आडतकर (२३), साहिल लावण (१९) आणि पवन शिंदे (२५) हे आता धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. आकस्मिक मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे. शिळ डायघर पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नवी मुंबईच्या एसआरपीएफ टीमने ठाण्यातील शिळ-डायघरजवळ एका मोकळ्या मैदानावर भरती मोहिमेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सुमारे २ हजार उमेवार सहभागी झाले होते. बिराडे धावण्याच्या चाचणीत सहभागी होत असताना सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. परीक्षेत ५० गुण मिळविण्यासाठी पाच किलोमीटरच्या तीन फेऱ्या २५ मिनिटांत पूर्ण करायच्या आहेत. “बिराडे चांगल्या वेगाने धावत होता पण शेवटच्या फेरीत तो कोसळला,” असे एसआरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले. त्याला तातडीने प्राथमिक उपचार करून कळवा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे दाखल केल्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. “उपचारानंतर तो स्थिर दिसत होता. त्याची बहीण आणि मेहुणे त्याला रुग्णालयात भेटायला गेले आणि तो त्यांच्याशी नेहमीप्रमाणे बोलत होता. तो फोनवर कोणाशी तरी बोलला आणि नारळ पाणीही प्यायला. मात्र, त्याला अचानक पुन्हा चक्कर आल्याने त्याचा मृत्यू झाला,” असे एसआरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले. कळवा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. ए माळगावकर म्हणाले, “त्याच्या मृत्यूचे नेमके कारण तपासले जात असून, पोस्टमॉर्टमनंतरच कळू शकेल.”बिराडे हा मूळचा जळगावचा असून, तो नवी मुंबईत बहिणीच्या घरी राहत होता. (Police)
Join Our WhatsApp Community