पी.व्ही. सिंधू (P.V. Sindhu) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिचा जन्म ५ जुलै १९९५ साली आंध्रप्रदेशातल्या हैद्राबाद येथे झाला. तिच्या वडिलांचं नाव पी.व्ही. रमण असं होतं आणि आईचं नाव विजया असं होतं. सुरुवातीला ते आंध्रप्रदेशातल्या एलुरू जिल्ह्यात राहायचे. त्यानंतर काही काळाने ते गुंटूर येथे राहायला गेले. (P.V. Sindhu)
(हेही वाचा- दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; PM Modi यांच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना सूचना)
सिंधूचे आई आणि वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरचे हॉलीबॉलचे खेळाडू होते. तिचे वडील भारतीय हॉलीबॉल संघाचे खेळाडू होते. त्यांनी १९८६ सालच्या सेउल एशियन गेम्स मध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवलं होतं. २००० साली सिंधूच्या वडिलांना त्यांच्या खेळातल्या योगदानाबद्दल भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. (P.V. Sindhu)
सिंधूचं बालपण हैद्राबाद येथेच गेलं. तिचं हायस्कुलचं शिक्षण एक्झिलीयम हायस्कुल इथे झालं. तर तिने सेंट ऍन्स कॉलेज फॉर वूमन्स, हैद्राबाद इथून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. (P.V. Sindhu)
(हेही वाचा- Team India Vijay Yatra : टीम इंडियाची विजय यात्रा, गर्दी हाताळताना पोलिसांची दमछाक )
सिंधूचे पालक हॉलीबॉलचे खेळाडू असले तरीही सिंधूने बॅडमिंटन खेळायचं ठरवलं. २००१ सालच्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन पुलेला गोपीचंद यांच्या यशापासून प्रेरणा घेऊन तिने बॅडमिंटन खेळायचं ठरवलं. वयाच्या आठव्या वर्षापासून सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. तिने सिकंदराबाद इथल्या इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन या खेळातल्या मूलभूत महत्वाच्या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर तिने गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं. (P.V. Sindhu)
सिंधूने दहा वर्षांखालील गटामध्ये पाचवी सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशीप दुहेरीत जिंकली. त्यानंतर तिने एकेरीत अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशीपमध्ये विजेतेपद भूषवलं. याव्यतिरिक्त तिने तेरा वर्षांखालील गटामध्ये पॉंडीचेरी येथे सब-ज्युनियर एकेरी खेळांत विजेतेपद पटकावलं होतं. तसंच तिने कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट IOC ऑल इंडिया रँकिंगमध्ये, सब-ज्युनियर नॅशनल विजेतेपद आणि पुण्यातल्या अखिल भारतीय रँकिंगमध्ये दुहेरीने विजेतेपद मिळवलं होतं. (P.V. Sindhu)
(हेही वाचा- Vidarbha Ashadhi Special Train: विदर्भकरांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या आषाढीवारीसाठी विशेष रेल्वे गाड्या )
सिंधूने ५१व्या राष्ट्रीय राज्य स्पर्धांमध्ये चौदा वर्षांखालील गटात सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यानंतर ती दक्षिण कोरियाचे पार्क-ताई सांग नावाच्या प्रशिक्षकांकडे शिकण्यासाठी गेली. तिला ऍगस द्वि सँटोसो आणि प्रकाश पदुकोण यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं आहे. (P.V. Sindhu)
हेही पहा-