Hardik Pandya : दीड महिन्यापूर्वी हूर्या, आता स्टेडिअममध्ये त्याच्या नावाचे नारे

Hardik Pandya : आयपीएलमध्ये गमावलं ते हार्दिकने टी-२० विश्वचषकात कमावलं आहे 

192
Hardik Pandya : दीड महिन्यापूर्वी हूर्या, आता स्टेडिअममध्ये त्याच्या नावाचे नारे
Hardik Pandya : दीड महिन्यापूर्वी हूर्या, आता स्टेडिअममध्ये त्याच्या नावाचे नारे
  • ऋजुता लुकतुके 

दीडच महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये तो मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) प्रेक्षकांना नुसता दिसला तरी लोक त्याची हुर्यो उडवायचे. समालोचकांनी त्याचं नाव उच्चारलं तरी त्याच्या नावाने आगडोंब उसळायचा. तो कर्णधार असताना संघ गुणतालिकेत शेवटून दुसरा राहिला. या पठ्ठ्याची आधीच्या प्रथितयश कप्तानाबरोबर सतत तुलना होत राहिली. फ्रँचाईजीच्या चाहत्यांचा मावळत्या कर्णधाराला जास्त पाठिंबा होता. (Hardik Pandya)

आयपीएलचा दीड महिना या खेळाडूसाठी अत्यंत कठीण होता. आधीच दुखापतीनंतर त्याने पुनरागमन केलेलं. त्यात बॅट आणि नेतृत्व दोन्ही चालेनासं झालं. मग तो जिथे जाईल तिथे चाहते त्याच्या विरुद्धचा राग मोकळा करायचे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याचा समावेश झाला आणि त्यातही तो उपकर्णधार झाला तेव्हाही अनेकांनी भुवया उंचावल्या. (Hardik Pandya)

(हेही वाचा- Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला; झारखंड उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश)

पण, क्रिकेटच्या मैदानावर जे गमावलं ते या पठ्ठ्याने इथंच परत कमावलं. अष्टपैलू मध्यमगती गोलंदाज ही त्याची जमेची बाजू. कारण, असा अष्टपैलू खेळाडू भारतात सध्या नाही. त्यामुळे त्याची संघात जागा पक्की होती. त्याने कामगिरीने ती आणखी मजबूत केली. अख्ख्या स्पर्धेत त्याने ११ बळी आणि १४४ धावा केल्या. अंतिम फेरीत डेव्हिड मिलर (David Miller) आणि हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) हे महत्त्वाचे बळीही मिळवले. मान उंचावत आता तो टी-२० विश्वचषकासह तो परत आला तेव्हा सत्कार समारंभाच्या वेळी वानखेडी मैदानावर लोकांनी त्याचं नाव उच्चारल्यावर जल्लोष केला, ‘हार्दिक, हार्दिक.’  (Hardik Pandya)

हार्दिकने टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) ९ सामन्यांत १५३ धावांच्या स्ट्राईकरेटने १४४ धावा केल्या. ११ बळीही मिळवले. मधल्या फळीत हार्दिकची (Hardik Pandya) फलंदाजी संघासाठी अनेकदा उपयुक्त ठरली. इंग्लंड विरुद्ध उपान्त्य लढतीत ४७ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवबरोबर (Suryakumar Yadav) अर्धशतकी भागिदारी करून हार्दिकने भारताची धावसंख्या १७० पार पोहोचवली. तर अंतिम सामन्यात मोक्याच्या क्षणी चेंडूवर नियंत्रण ठेवत २० धावांत ३ बळी मिळवले. (Hardik Pandya)

(हेही वाचा- भारतीय खेळाडू P.V. Sindhu बॅडमिंटनकडे कशी वळली ?)

टी-२० विश्वचषकानंतर या प्रकारात आयसीसी क्रमवारीत त्याने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. (Hardik Pandya)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.