खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?

145
खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?
खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?

खलिस्तानी आतंकवादाच्या आरोपाखाली कारागृहात असलेला अमृतपाल सिंग (Amritpal Singh) आणि काश्मिरी फुटीरतावादी शेख अब्दुल रशीद (इंजिनिअर रशीद, Engineer Rashid) ५ जुलैरोजी पॅरोल आदेशातील काही अटींच्या अधीन राहून लोकसभेचे सदस्य (MP Oath) म्हणून शपथ घेणार आहेत.

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला; झारखंड उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश)

तुरुंगात कैद असणारा खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग संसदेत खासदारकीची शपथ घेणार आहे. त्यासाठी अमृतपाल सिंगला आज आसामहून दिल्लीत आणण्यात येणार आहे. वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख असलेला अमृतपाल हा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत 9 साथीदारांसह आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेल्या अमृतपालला चार दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. याच दरम्यान तो लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहे.

अमृतपाल सिंगला 5 जुलैपासून चार दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला आहे. अमृतपालला आसाममधून ‘लष्करी विमानाने’ दिल्लीत आणले जाईल आणि नंतर परत तुरूंगातून घेऊन जाणार आहेत. अमृतपालला आणण्यासाठी पंजाब पोलिसांचे पथक आसाममध्ये पोहोचले आहे. पॅरोलच्या कालावधीत अमृतपाल कोणत्याही विषयावर मीडियाशी बोलू शकत नाही, मीडियाला संबोधित करू शकत नाही किंवा कोणतेही वक्तव्य देऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्या कुटुंबियांनाही मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य करता येणार नाही.

रशीद इंजिनिअरही आज घेणार शपथ

टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेला फुटीरतावादी काश्मिरी नेता शेख अब्दुल रशीद शुक्रवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथून खासदार निवडून आलेला रशीद दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्यांना ‘इंजिनिअर रशीद’ या नावानेही ओळखले जाते. रशीदला शपथ घेण्यासाठी दोन तासांचा कोठडी पॅरोल देण्यात आला आहे, ज्यामध्ये तिहार ते संसदेपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेचा समावेश नाही. पॅरोलच्या कालावधीत तो मीडियाशी कोणत्याही मुद्द्यावर बोलू शकत नाही, मीडियाला संबोधित करू शकत नाही किंवा कोणतेही वक्तव्य करू शकत नाही.

काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी गटांना आणि फुटीरतावाद्यांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयएने अटक केलेल्या काश्मिरी व्यापारी जहूर वटालीच्या तपासादरम्यान राशिदचे नाव समोर आले होते. एनआयएने या प्रकरणात काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले होते. मलिकला आरोपांमध्ये दोषी ठरवल्यानंतर 2022 मध्ये ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

खासदारकीची शपथ निभावणार का ?

खासदारकीची शपथ घेतांना ‘मी कायद्याद्वारे स्थापित केलेल्या भारतीय संविधानाशी खरा विश्वास आणि निष्ठा ठेवीन की, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम ठेवीन आणि मी ज्या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन.’ असे म्हटले जाते. ज्यांच्यावर देशात फुटीरतावादी कारवाया करण्यासारखे गंभीर आरोप आहेत, ते अमृतपाल सिंग आणि इंजिनिअर रशीद भारताची अखंडता कायम ठेवण्याची शपथ निभावणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.