Rohit Sharma : मुंबईत ओपन – एअर बसमधील मिरवणुकीपूर्वी कर्णधार रोहितची ‘ही’ कृती उपस्थितांचं मन जिंकून गेली

Rohit Sharma : रोहित शर्मा हा क्रिकेटच्या मैदानाबाहेर संवेदनशीलतेसाठी ओळखला जातो 

2113
Rohit Sharma : मुंबईत ओपन - एअर बसमधील मिरवणुकीपूर्वी कर्णधार रोहितची ‘ही’ कृती उपस्थितांचं मन जिंकून गेली
Rohit Sharma : मुंबईत ओपन - एअर बसमधील मिरवणुकीपूर्वी कर्णधार रोहितची ‘ही’ कृती उपस्थितांचं मन जिंकून गेली

ऋजुता लुकतुके 

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ तीन दिवसांनी मायदेशी परतला. इतके दिवस त्यांची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आता दिवसभर दुसरा विषय नव्हता. खेळाडूही अगदी विमानापासून सगळीकडे विश्वचषक चाहत्यांना उंचावून दाखवत होते. त्याच्याबरोबर फोटोही काढत होते. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना खेळाडूंनी चषक दाखवला. तेव्हा त्यांनी फोटो तर काढला पण, चषकाला हात लावायला नकार दिला. ‘चषक खेळाडूंनी जिंकलाय, त्याच्यावर त्यांचाच अधिकार आहे,‘ अशी भावना त्यामागे होती.  (Rohit Sharma)

(हेही वाचा- खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?)

या ह्रद्य प्रसंगानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) आणखी एक कृती चाहत्यांचं लक्ष वेधून गेली. दिवसभर अनेकांनी हाताळलेला हा चषक काहीसा खराब झाला होता किंवा त्यावर थोडे डाग पडले होते. मुंबईत आल्यावर हे रोहितच्या लक्षात आलं आणि त्याने जवळचा एक कागद घेऊन लगेच चषक नीट पुसून साफ केला. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरलही झाला. रोहितला त्यासाठी चाहत्यांची दादही मिळत आहे. (Rohit Sharma)

 काहींनी रोहितच्या या कृतीची तुलना २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) कृतीशी केली आहे. अहमदाबादच्या ड्रेसिंग रुममध्ये मार्श चषकावर पाय ठेवून बसला होता. त्याने तसा फोटो काढून घेतला होता. भारतीय चाहत्यांना ही कृती तेव्हाही उद्दामपणाची वाटली होती. पण, त्यावर प्रतिक्रिया देताना मार्शने, ‘अशी कृती पुन्हा पुन्हा करेन,’ असं म्हटलं होतं. (Rohit Sharma)

(हेही वाचा- Hardik Pandya : दीड महिन्यापूर्वी हूर्या, आता स्टेडिअममध्ये त्याच्या नावाचे नारे)

मार्शच्या तुलनेत रोहितला चषकाची काळजी घेताना बघून चाहत्यांनी रोहितचं अभिनंदन केलं आहे. २९ जूनला भारतीय संघाने टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यावर गुरुवारी पहाटे संघ आधी नवी दिल्लीत पोहोचला. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतल्यावर दुपारी साडेतीन वाजता संघ मुंबईसाठी रवाना झाला. इथं संघाची ओपन एअर बसमधून मिरवणूक काढण्यात आली. आणि नंतर वानखेडे मैदानावर जाहीर सत्कार करण्यात आला. (Rohit Sharma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.