PM Narendra Modi यांची मुंबईत सभा; करणार १५ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

PM Narendra Modi : दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड या उन्नत रस्त्याचे भूमीपूजनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. या प्रकल्पाची किंमत ११७० कोटी रुपये एवढी आहे. एकूणच भाजप आता विकासकामांचा धडाका लावणार आहे, असे चित्र दिसते.

165
PM Narendra Modi यांची मुंबईत सभा; करणार १५ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

भाजपने आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी चालू केली आहे. १३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत अनेक विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत. यानंतर १४ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुण्यात भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान ज्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत त्यांचा एकूण अंदाजित खर्च १५ हजार ८७० कोटी रुपये आहे.

(हेही वाचा – India Tour of Zimbabwe : जाणून घेऊया भारतीय संघाच्या झिंबाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक)

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन १२ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर १३ जुलै रोजी पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली-ठाणे लिंक रोडचा भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. गोरेगाव-मुलुंड मेट्रो प्रकल्प ६ हजार ३०० कोटी रुपयांचा आणि बोरिवली-ठाणे लिंक रोड प्रकल्प ८ हजार ४०० कोटी रुपयांचा आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड या उन्नत रस्त्याचे भूमीपूजनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. या प्रकल्पाची किंमत ११७० कोटी रुपये एवढी आहे. एकूणच भाजप आता विकासकामांचा धडाका लावणार आहे, असे चित्र दिसते.

१३ जुलै रोजी विविध विकासकामांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पश्चिम उपनगरातील नेस्को सेंटर (गोरेगाव) येथे सभेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.