One Stop Screening : ‘या’ देशांमध्ये होणार विमान प्रवाशांच्या बायोमेट्रिक्स डेटाची देवाणघेवाण, कारण काय ? जाणून घ्या…

प्रवाशांचा बायोमेट्रिक डेटा आता दोन्ही देशांच्या सरकारकडे असेल.

141
One Stop Screening : 'या' देशांमध्ये होणार विमान प्रवाशांच्या बायोमेट्रिक्स डेटाची देवाणघेवाण, कारण काय ? जाणून घ्या...
One Stop Screening : 'या' देशांमध्ये होणार विमान प्रवाशांच्या बायोमेट्रिक्स डेटाची देवाणघेवाण, कारण काय ? जाणून घ्या...

भारत आणि अमेरिकेदरम्यान वन स्टॉप स्क्रिनिंग करार (One Stop Screening) होणार आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांच्या सामानाची वारंवार तपासणी केली जाणार नाही. उदाहरणार्थ न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमान फेरीसाठी नवी दिल्ली विमानतळावरच प्रवाशाचे सामान तपासले जाईल. पुढे हा प्रवासी न्यूयॉर्कहून अमेरिकेतील इतर शहरात कनेक्टिंग फ्लाइटने जात असला, तरीही त्याची तपासणी होणार नाही.

प्रवाशांचा बायोमेट्रिक डेटा आता दोन्ही देशांच्या सरकारकडे असेल. भारतातर्फे आयबीकडे तर अमेरिकेत कस्टम बॉर्डर कन्ट्रोलकडे हा डेटा राहील. दोन्ही सरकारी संस्थाच परस्परांना माहितीची देवाणघेवाण करतील. डेटा तिसऱ्या संस्थेकडे नसेल. वैयक्तिक गोपनीयतेचेदेखील उल्लंघन त्यामुळे होणार नाही. अलीकडेच भारत-अमेरिका एव्हिएशन समिटदरम्यान (India-US Aviation Summit) यूएस ट्रान्सपोर्टेशनचे प्रमुख डेव्हिड पिकोस्के म्हणाले, दोन्ही देश सायबर सुरक्षेचा डेटाही परस्परांना देतील.

(हेही वाचा – Champions Come Home : दीड महिन्यांनी मायदेशात परतल्यावर खेळाडूंनी कशावर ताव मारला? )

दोन्ही देशांकडे डेटा, प्रायव्हसीला धोका नाही
भारत व अमेरिका विमानसेवा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवाशांचा बायोमेट्रिक्स डेटा परस्परांना दिला जाणार आहे. दोन्ही देशांत यावर सहमती झाली आहे. त्यामागे विमान प्रवाशांची वाढती संख्या तसेच सुरक्षेचाही मुद्दा समोर आला. बायोमेट्रिक्स डेटामुळे प्रत्येक विमान प्रवासाची माहिती दोन्ही देशांकडे राहील. बायोमेट्रिक्स डेटामध्ये बोटांचे ठसे, डोळे आणि चेहऱ्याचा तपशील हे समाविष्ट असेल. ही माहिती एक वर्षापर्यंत सुरक्षित असेल. भारताने १९८५चा कनिष्क फ्लाइटचा अपघात अनुभवला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.