Bengal Assembly Session : राज्यपालांना डावलून अध्यक्षांनी बोलाविले विधानसभेचे अधिवेशन

150
Bengal Assembly Session : राज्यपालांना डावलून अध्यक्षांनी बोलाविले विधानसभेचे अधिवेशन

इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचे दात खायचे वेगळे आणि दाखविण्याचे वेगळे आहेत. इंडी आघाडी संविधानाची प्रत सोबत बाळगून फक्त नाटक करीत आहेत. प्रत्यक्षात इंडी आघाडीच संविधानातील नियमांची पायमल्ली करीत आहे. याचे जीवंत उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल सरकार. बंगाल विधानसभा अध्यक्षांची कृती संविधानाची अवहेलना करणारी आहे. (Bengal Assembly Session)

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला असतानाच ममता सरकारने संविधानाची पायमल्ली करणारे पाउल उचलले आहे. यामुळे संपूर्ण देशात या घटनेची निंदा केली जात आहे. (Bengal Assembly Session)

(हेही वाचा – खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?)

बंगालची सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे दोन नवनिर्वाचित आमदार सायंतिका बॅनर्जी आणि रयत हुसैन सरकार यांच्या शपथविधीवरून बंगालमध्ये महाभारत छेडले. दोन्ही आमदारांचा शपथविधी लांबल्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. यामुळे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस आणि विधानसभेचे अध्यक्ष विमान बॅनर्जी यांच्यात शाब्दीक चकमक सुरू झाली आहे. (Bengal Assembly Session)

अशातच, बंगाल विधानसभेचे अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी राज्यपालांची परवानगी न घेता विधानसभेचे अधिवेशन बोलाविले आहे. हे अधिवेशन शुक्रवारी बोलाविण्यात आले असून दुपारी दोन वाजल्यापासून कार्यवाही सुरू होणार आहे. सभागृहाचे कामकाज राज्यपालांवर पूर्णपणे अवलंबून नाही, असे भाष्य बॅनर्जी यांनी केल्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Bengal Assembly Session)

विमान बॅनर्जी विधानसभेत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची विशेष बैठक होणार आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून शपथ वादात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. हे उद्दामपणाची लढाई असल्याचा आरोप सभापतींनी राज्यपालांवर केला होता. (Bengal Assembly Session)

(हेही वाचा – Britain Election Result 2024 : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव; लेबर पार्टी मतमोजणीत आघाडीवर)

राज्यपाल जाणूनबुजून गतिरोध निर्माण करत आहेत – विधानसभा अध्यक्ष

शपथेच्या मुद्यावरून राज्यपाल जाणीवपूर्वक गतिरोध निर्माण करत आहेत. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सभापतीने राज्यपालांना डावलून २४ तासांपेक्षा कमी कालावधीत अचानक विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. साधारणपणे विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांची परवानगी आवश्यक असते. पावसाळी अधिवेशन जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात बोलावले जाते. त्याऐवजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. (Bengal Assembly Session)

विधानसभा अध्यक्षांनी दिला मोठा इशारा

दोन नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीबाबत मोठा निर्णय घेण्याचे संकेतही विधानसभा अध्यक्षांनी दिले. राज्यपालांचे नाव न घेता निशाणा साधत सभापती म्हणाले की, विधानसभा लाचार नाही आणि सर्व काही राज्यपालांच्या हातात नाही. नियम, कायदे आणि घटनात्मक निकष आहेत. नियमानुसार कोणताही सभापती विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकतो. हा त्यांचा विशेषाधिकार आहे. सभापतींच्या या पावलामुळे राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्याने राजभवनावरून आणखी संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. (Bengal Assembly Session)

विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्यासाठी राज्यपालाची परवानगी घेणे आवश्यक असते. अशातही बंगालमध्ये राज्यपालांना डावलण्यात आले आहे. ही कृती संविधानाचे रक्षण करणारी आहे की पायमल्ली करणारी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Bengal Assembly Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.