Pune Railway Police: पुणे रेल्वे पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा, उमेदवारांनी काय करावे ? वाचा सविस्तर

पुणे लोहमार्ग पोलीस विभागाच्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

140
Teachers Exam : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ होणार 'या' तारखेला

पुणे लोहमार्ग पोलीस (Pune Railway Police) विभागाने घेतलेल्या पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गतची लेखी परीक्षा रविवारी, (ता. ७ जुलै) रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेत परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे लोहमार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केले आहे.

पुणे लोहमार्ग पोलीस विभागाच्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे लोहमार्ग पोलीस विभागातर्फे पोलीस शिपाई या पदावरील ५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी ३ हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी १६०० जण मैदानी चाचणीमध्ये पात्र झाले होते. या उमेदवारांपैकी मैदानी चाचणी, गुणवत्ता यादी, जात प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार एकास १० याप्रमाणे ३८३ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Champions Return Home : भारतीय खेळाडूंना बघायला जेव्हा एक चाहता झाडावर चढला…. )

संबंधित उमेदवारांच्या नावांची यादी punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, मैदानी चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी ७ जुलै २०२४ या दिवशी होणार आहे. ही परीक्षा लष्कर परिसरातील ए.के.न्यू लॉ ॲकॅडमी ॲण्ड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर, २३९०, के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, पुणे – ४११००१ या ठिकाणी होणार आहे.

सूचना
उमेदवारांनी सकाळी ७ वाजता परीक्षेच्या ठिकाणी हजर रहायचे आहे. सकाळी ९.३० वाजल्यानंतर कोणालाही परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्यादृष्टीने उमेदवारांनी काळजी घेऊन वेळेत उपस्थित राहावे. परीक्षेसाठी आवश्‍यक साहित्य लोहमार्ग पोलिसांकडून दिले जाणार आहे, त्यामुळे पेन, पेन्सिल व अन्य कोणतेही साहित्य उमेदवारांनी आणू नये, असे आवाहनही दोषी यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.