शिक्षण मंत्री आतिशी यांच्या परवानगीशिवाय पाच हजार शिक्षकांच्या बदलांचा मुद्दा आता जोर धरू लागला आहे. गेल्या १० वर्षांपासून एकाच शाळेत असलेल्या पाच हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, शिक्षण मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना बदल्या रद्द करण्याच्या आदेशाचे पालन का करण्यात आले नाही? यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केला आहे. (Delhi Teachers Transfers)
दिल्लीतील शिक्षकांच्या मुद्द्यावरून देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा महाभारत सुरू झाले आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत महणजे मंगळवारी मध्यरात्री शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तब्बल ५ हजार शिक्षकांच्या बदल्यांचे (Teachers Transfers) आदेश जारी करण्यात आला. हे सिक्षक गेल्या दहा वर्षांपासून एकाच शाळेत तळ ठोकून बसले होते. त्यामुळे वार्षिक बदली कार्यक्रमानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. (Delhi Teachers Transfers)
(हेही वाचा – New Chess Star : भारतीय वंशाची बोधना शिवानंदन नवव्या वर्षी ग्रेट ब्रिटनसाठी खेळणार)
यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांकडून जे आदेश देण्यात आले होते त्याचे पालन झाले नाही. यामुळे शिक्षण मंत्र्यांची अवमानना केल्याबद्दल आतिशी यांनी राज्याचे शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालनालय यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, या बदल्यांमुळे सरकारी शाळा शिक्षक संघाने नाराजी व्यक्त केली असून शिक्षकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जावी अशी मागणी केली आहे. शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने आजच शिक्षण सचिवांचीही भेट घेतली असून त्यांच्याकडे आपल्या चिंता व्यक्त केल्या. काही शिक्षकांच्या माणण्यानुसार या बदलीच्या प्रकारामुळे शिक्षक आणि विद्यार्थी संबंधांवर परिणाम होईल तसेच जे शिक्षक आजारी अथवा दिव्यांग आहेत त्यांनाही अडचणीचा सामना करावा लागेल. (Delhi Teachers Transfers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community