Chandrababu Naidu पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीला; आंध्रसाठी १३ लाख कोटींची मागणी

134
Chandrababu Naidu पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीला; आंध्रसाठी १३ लाख कोटींची मागणी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दोन दिवसांत पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागण्यांची लांबलचक यादी दिल्याची चर्चा राजधानीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विशेष पॅकेजची मागणी असल्याचे समजते. (Chandrababu Naidu)

चंद्राबाबू यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि नायडू यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्याआधीच रेड्डी यांनी दिल्लीवारी करत मोदींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे आंध्र प्रदेशसाठी विविध योजना व निधी मागणी केल्याची चर्चा आहे. (Chandrababu Naidu)

मोदींनंतर नायडू यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, जे. पी. नड्डा यांच्यासह इतरही काही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. एनडीए सरकारमध्ये नायडूंना मोठे महत्व आहे. या पार्श्वभूमीवर नायडूंचा दिल्लीतील झंझावत चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात विशेष पॅकेज मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. (Chandrababu Naidu)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांची मुंबईत सभा; करणार १५ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन)

आंध्रला हवेत १३ लाख कोटी

नायडूंनी मोदींकडे सुमारे १३ लाख कोटींच्या कर्जाची मागणी केल्याचे समजते. त्याचप्रमाणे जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात विविध योजनांचे रखडलेले काम आणि निधी पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रामुख्याने राज्याची राजधानी म्हणून अमरावतीमध्ये पायाभूत सविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान रेड्डींसमोर आहे. त्यांच्या पाठिंब्यांवर केंद्र सरकार तग धरून असल्याने मोदींना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नायडू यांनी दिल्लीवारी करत केलेल्या मागण्यांबाबत केंद्राला सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. (Chandrababu Naidu)

नायडूंनी मोदींकडे सुमारे १३ लाख कोटींच्या कर्जाची मागणी केल्याचे समजते. त्याचप्रमाणे जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात विविध योजनांचे रखडलेले काम आणि निधी पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रामुख्याने राज्याची राजधानी म्हणून अमरावतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान रेड्डींसमोर आहे. (Chandrababu Naidu)

नायडूंचे दबावतंत्र

केंद्र सरकारमध्ये नायडू यांचे वजन वाढले आहे. त्यांच्या पाठिंब्यांवर केंद्र सरकार तग धरून असल्याने मोदींना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नायडू यांनी दिल्लीवारी करत केलेल्या मागण्यांबाबत केंद्राला सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. (Chandrababu Naidu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.