राजकारणदेखील क्रिकेटसारखेच आहे. कोण, कधी, कोणाची विकेट घेईल, सांगता येत नाही. सूर्यकुमारजी तुम्ही ज्या पद्धतीने वेगळी कॅच घेतली तसेच आमच्या ५० जणांच्या टीमने २ वर्षांपूर्वी एकाची विकेट घेतली होती, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तुमच्या खेळामुळे ज्या पद्धतीने सुख आणि समाधान चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसते तसेच सुख आणि समाधान राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर दिसावे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
ठाकरेंना टोला लगावल्यानंतर हा गमतीचा भाग आहे, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. महाराष्ट्रातील चारही खेळाडूंसह भारतीय संघाने ज्या प्रकारचा खेळ दाखवला ते अभिमानास पात्र असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या राजकारणातील खेळदेखील वेगळा आहे. राजकारणात कोण, कोणाची कधी कॅच घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हालादेखील चांगली बॅटिंग करावी लागते, असेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या सभागृहातील अनेक सदस्यदेखील अनेक वेळा चौकार षटकार मारत असतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा – Pune Railway Police: पुणे रेल्वे पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा, उमेदवारांनी काय करावे ? वाचा सविस्तर)
पाकिस्तानला भारतीय संघाने हरवले त्याचवेळी…
विश्वविजेत्या भारतीय संघाचे मी अभिनंदन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. विश्वविजेत्या या संघातील चारही खेळाडूंचे मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने टी-20 विश्वकप जिंकून दिला आहे. पाकिस्तानला भारतीय संघाने हरवले त्याचवेळी आपण अर्धा वर्ल्ड कप जिंकला होता. मागील आठवडाभर देशभरात जल्लोष होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या खेळाडूंचे अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
४ खेळाडूंना १ कोटी रुपयांचे बक्षीस
सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार करण्यात आला. विधान भवनाच्या सभागृहात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला. यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील ४ खेळाडूंना १ कोटी रुपयांचे बक्षीसदेखील देण्यात आले. संघाच्या यशात सर्व खेळाडूंचा सहभाग असल्याचे रोहित शर्मा यांनी म्हटले आहे. विश्वचषक जिंकणे हे आमचे स्वप्न होते, असेदेखील रोहित शर्मा यांनी म्हटले आहे. ‘मुंबईचा राजा, रोहित शर्मा’ अशी घोषणाबाजी यावेळी सभागृहात करण्यात आली.
हेही पहा –