कोल्हापूरच्या श्री ज्योतिबा मंदिर परिसर व त्याच्या आजुबाजूच्या डोंगर परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ५ जुलै रोजी विधानसभेत केली. पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विविध विषयांबाबत खुलासे केले त्यावेळी ही घोषणा केली. (Kolhapur Jyotiba Temple)
(हेही वाचा – Marine Drive ची रात्रभर स्वच्छता; तब्बल पाच जीप भर बुट, चप्पल झाले जमा)
श्री ज्योतिबा मंदिर परिसर आणि त्याच्या आजुबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजित प्राधिकरणाची आवश्यकता आहे. शासन स्तरावर याबाबत कार्यवाही सुरु आहे आणि त्यासाठी श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल, असे पवार यांनी आश्वासन दिले. तसेच जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील संतांचे मोठे गुरुबंधू मानले जातात. त्यांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्याला आवश्यक निधी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Kolhapur Jyotiba Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community