अतिरिक्त अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला. अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केला. पण पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने विरोधी पक्षाने सभागृहातूनच सभात्याग केला. (Monsoon Session)
वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या सगळ्या मुद्यांच्या संदर्भात आम्हाला बोलू दिले नाही. अर्थसंकल्पात आकडे फक्त फुगवून दाखवले आणि प्रत्यक्ष खर्च कमी दाखवला आहे. कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या २०२३- २४ मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ ४७ टक्के झालेला आहे. मागास वर्गीय समाजाच्या कल्याणावर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि BDS वर दिलेला विनियोजन खर्च यात मोठी तफावत आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचं पाप या सरकारकडून होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. (Monsoon Session)
(हेही वाचा – Pune Railway Police: पुणे रेल्वे पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा, उमेदवारांनी काय करावे ? वाचा सविस्तर)
या सरकारमध्ये जाणारे आरएसएसच्या संस्कृतीला, मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेत आहेत. मात्र इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर एक रुपयाही अद्याप खर्च झालेला नाही. त्यामुळे बोलाची कढी आणि बोलाचाच भात असे सांगत केवळ वाढवून दाढी राज्य कारभार करता येत नाही असा टोलाही वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला. (Monsoon Session)
मुंबईतील जवळपास १३ मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा घाट या सरकारने घातला असून त्यातील पाच प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. त्याचा शासन निर्णयही काढला आहे. अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रकल्पातून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतला आहे. अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत असा थेट आरोपही वडेट्टीवार यांनी सरकारवर केला. (Monsoon Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community