शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे माझा छळ करीत असल्याची तक्रार देशाचे पंतप्रधान यांना पत्र पाठवून करणाऱ्या डॉ. स्वप्ना राऊत यांच्याविरुद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बोगस दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. पाटकर यांनी बोगस डिग्री मिळवून रुग्नाच्या जीवाशी खेळ केला असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे लीलावती रुग्णालयात केली नोकरी!
डॉ. स्वप्ना पाटकर या वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात आणि रिसर्च सेंटर येथे ऑनररी कन्सल्टन या पदावर होत्या. डॉ. स्वप्ना यांनी लीलावती रुग्णालयात सादर करण्यात आलेली क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट या विषयावर पीएचडी केल्याचे प्रमाणपत्र हे बोगस असून हे प्रमाणपत्र कानपूर येथील छत्रपती शाहू महाराज विश्व विद्यालयातून मिळाल्याचे म्हटले होते. मात्र या प्रमाणपत्राच्या व्याकरणातील चुका आणि टायपिंग मिस्टेकवरून हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. २०१६ पासून डॉ. स्वप्ना पाटकर यांनी लीलावती रुग्णालायत या प्रमाणपत्राच्या जोरावर नोकरी मिळवली होती. काही महिन्यापूर्वीच रुग्णालयाने डॉ. स्वप्ना पाटकर यांना लीलावती रुग्णालय प्रसाशनाने कामावरून कमी केले होते, अशी माहिती समोर येत आहे.
At BandraPolice Station to get justice for Dr Swapna Patker who had the courage to file a Writ in BombayHighCourt against Shiv Sena MP @rautsanjay61 Police bullying starts with her being arrested today on an unknown persons complaint that her Ph.D degree of2009 is fake @AmitShah pic.twitter.com/VWTQbA1XIB
— Abha Singh (@abhasinghlawyer) June 8, 2021
(हेही वाचा : लसीकरणाचे वाचलेले ७ हजार कोटी गरिबांना वाटा!)
वांद्रे पोलिसांनी स्वत: डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल!
एका गैरसरकारी संस्थेच्या पदाधिकारी गुरुदीप कौर सिंग यांनी ही बाब उघडकीस आणून वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डॉ. पाटकर यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे स्वतःला क्लिनिकल सायकलॉजिस्ट असल्याचे सांगून रुग्नाच्या जीवाशी खेळत होत्या, अशी तक्रार तक्रारदार गुरुदीप कौर यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी बोगस दस्तवेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीसानी दिली आहे. डॉ. स्वप्ना पाटकर यांनी काही महिन्यापूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करून राऊत हे माझा छळ करीत असल्याचा आरोप केला होता, तसेच देशाचे पंतप्रधान यांना पत्र लिहून मला न्याय देण्यात यावा अशी विनंती पत्राच्या माध्यमातून केली होती. पाटकर यांच्या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
Join Our WhatsApp Community