Central Railway : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

182
Central Railway : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक
Central Railway : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे, (Central Railway) मुंबई विभाग दि. ०७.०७.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर सकाळी १०.५० ते दुपारी ०३.२० पर्यंत उपनगरीय सेवांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

BL-13 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.४६ वा.) ते AN-15 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०२.४२ वा.) डाऊन जलद/निम जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व त्यांच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

अप जलद/निम जलद लोकल A-26 (कल्याण येथून सकाळी १०.२८ वा.) ते BL-40 (कल्याण येथून दुपारी ०३.१७ वा.) कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. तसेच पुढे ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि त्यांच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल
पुढील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ट्रेन क्रमांक 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 12321हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

ट्रेन क्रमांक 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 12294 प्रयागराज – लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 11080 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 12162 आग्रा छावणी – लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्सप्रेस

डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल
खालील डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया कामायनी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटणा एक्सप्रेस

मेमू सेवा अर्ध स्थगित

मेमू क्रमांक 01339 वसई रोड – दिवा वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी कोपर पर्यंत (सकाळी १०.३१) धावेल व कोपर ते दिवा स्थानकादरम्यान रद्द राहील.

मेमू क्रमांक 01341 वसई रोड-दिवा वसई रोड येथून दुपारी १२.५० वाजता सुटणारी गाडी कोपर पर्यंत (दुपारी ०१.३७) चालविण्यात येईल व कोपर ते दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

मेमू क्रमांक 01340 दिवा – वसई रोड कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल व वसई रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल व दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

मेमू क्रमांक 01342 दिवा – वसई रोड कोपर येथून दुपारी ०२.४५ वाजता सुटेल व वसई रोड येथे दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल व दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

मेमू क्रमांक 50104 रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

सकाळी ११.१० ते दुपारी ०४.१० पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाउन हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटणार आहे.

अप हार्बर मार्गावर :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेलहून सुटणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.४५ वाजता पनवेलहून सुटणार आहे.

हे दुरुस्तीचे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.