मुंबईतील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्क्रॅप यार्डची मागणी होत असतानाच आता जप्त करण्यात येणाऱ्या वाहनांची ऑन दी स्पॉट करण्याचा विचार प्रशासनाचा सुरु आहे. बेवारस वाहनांवर महापालिकेच्यावतीने नोटीस चिकटवल्यानंतर तसेच संबंधित वाहन मालकांना नोटीस पाठवल्यानंतर वाहने त्या जागेवरुन न हलविल्यास नियुक्त कंत्राटदारामार्फतच याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यामुळे ही वाहने हलवण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्ण्यासाठी स्क्रॅप यार्डची गरजही लागणार नाही. (BMC)
मुंबईतील अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने उभी केली जात असून बरीच वाहने महिनोंमहिने एकाच जागी उभी असतात. वापरात नसलेली बेवारस वाहनांमुळे त्या भागातील स्वच्छता राखली जात नाही. तसेच पावसाळ्यात या वाहनांमध्ये पाणी जमा होऊन डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांचा प्रार्दुभाव वाढून आजारांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने या बेवारस वाहनांविरोधात जनतेच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने नोटीस चिकटवून ठराविक कालावधीत वाहने न हलविल्यास ते वाहन जप्त करून त्याची विल्हेवाट महापालिकेच्यावतीने केली जाते. यासाठी लिलाव पद्धतीने या जप्त केलेल्या बेवारस वाहनांची विक्री केली जात आहे. (BMC)
(हेही वाचा – आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण; Pravin Darekar यांनी सुनावले खडेबोल)
या बेवारस वाहने रस्त्यांवरून हलवून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने स्क्रॅप यार्डकरता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र, आता या स्क्रॅप यार्डसाठी जागेचा शोध घेऊन त्यांची निर्मिती करण्याऐवजी गाड्यांचा लिलाव पद्धतीने विक्री करण्यासाठी एका कंपनीची निवड केली जाईल. या कंपनीच्या माध्यमातून बेवारस वाहनाला महापालिकेच्यावतीने नोटीस चिकटवल्यानंतर तसेच संबंधित मालकाला पाठवल्यानंतर त्यांनी जर ते वाहन न हलवल्यास ते वाहन नियुक्त कंपनीच्या माध्यमातून उचलून नेले जाईल आणि त्याची विक्री करेल. ज्यामुळे महापालिकेला स्क्रॅप यार्ड करता जागेची आवश्यकता भासणार नाही आणि लिलाव पध्दतीने जास्त बोली लावून महापालिकेला पैसे देणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून वाहने उभी असलेल्या जागेवरूनच वाहने भंगारात काढली जातील. यामध्ये नोटीस बजावण्याची कार्यवाही महापालिका करणार असून वाहने उचलून नेत त्याची विक्री करण्याची जबाबदारी ही नियुक्त कंत्राटदाराची असेल, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community