Jotiba Temple मूर्ती संवर्धन प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार, ११ जुलैपर्यंत दर्शन बंद

पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी अहवाल दिला होता.

149
Jotiba Temple मूर्ती संवर्धन प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार, ११ जुलैपर्यंत दर्शन बंद

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पडल्यानंतर आता दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार (७ जुलै) पासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ४ दिवस सुरू राहणार असल्याने गुरुवार ( ११ जुलै) पर्यंत देवाचे दर्शन बंद राहणार असल्याचे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.  (Jotiba Temple)

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने पुणे पुरातत्त्व विभाग यांना पाहणी करण्यास कळवले होते. त्यावर पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी अहवाल दिला होता. या अहवालाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान देवस्थान समितीच्या वतीने ७ जुलैपासून केदारलिंग देवाच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया केली जाणार असून देवाचे दर्शन ११ जुलैपर्यंत बंद राहणार आहे.

(हेही वाचा – Ganesh chaturthi wishes in marathi: आपल्या प्रियजनांना द्या गणेश चतुर्थीच्या या खास शुभेच्छा… )

देवस्थान समितीचे आवाहन…
या कालावधीत उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून भाविकांनी कासव चौकातून दर्शन घ्यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.