छत्तीसगडमधील शुक्रवारी, (५ जुलै) २ वेगवेगळ्या कारणांमुळे विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जांजगीर येथील घटनेत विहिरीत विषारी वायू गळतीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला, तर कोरबा येथे पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलीने विहिरीत उडी मारली होती, त्यानंतर कुटुंबातील आणखी दोन जण विहिरीत उतरले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
जांजगीरमध्ये चंपा येथे ही घटना शुक्रवारी ५ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता (Chhattisgarh) घडली. विहिरीत पडलेली लाकडं काढण्यासाठी एक व्यक्ती विहिरीत उतरला होता; परंतु विहिरीत विषारी वायू असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी शेजारी राहणारे चारजण एक एक करून खाली उतरले होते, मात्र त्यातील कोणीही जिवंत बाहेर येऊ शकले नाही. त्यांचाही विषारी वायूमुळे मृत्यूही झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.
विषारी वायूमुळे मृत्यू
विषारी वायुमुळे (Gas Leakage) एकापाठोपाठ एक विहिरीत पडून ५ जणांचा मृत्यू (Poisonus Gas) झाला. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि बिररा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एसडीआरएफच्या (State Disaster Response Force) टीमलाही पाचारण करण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
विहिरीत पडून मृत्यू
दुसऱ्या घटनेत कोरबा जिल्ह्यातील कटघोरा पोलीस ठाण्यांतर्गत जुराली गावातील डिपारापारा येथे विहिरीत बुडून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत वडील विहिरीत पडल्यानंतर मुलीने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. यानंतर कुटुंबातील इतर दोन सदस्यही विहिरीत उतरले होते. मात्र, त्या सर्वांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आणि बचावासाठी एसडीआरएफ पथकाला घटनास्थळी पाचारण केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community