३७० कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देणारे जननायक Dr. Shyama Prasad Mukherjee

152
३७० कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देणारे जननायक Dr. Shyama Prasad Mukherjee
३७० कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देणारे जननायक Dr. Shyama Prasad Mukherjee

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) हे एक शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म ६ जुलै १९०१ साली कलकत्ता इथल्या एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचं नाव सर आशुतोष मुखर्जी असं होतं. ते अष्टपैलू प्रतिभावंत होते. तसेच ते शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते.

(हेही वाचा- Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण!)

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांनी १९१७ साली मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं. १९२१ साली त्यांनी बी.ए.चं पदवी शिक्षण पूर्ण केलं. १९२३ साली कायद्याचं शिक्षण घेऊन, पदवी मिळवल्यानंतर ते परदेशात गेले आणि बॅरिस्टर झाले. त्यानंतर १९२६ साली इंग्लंडहून आपल्या मायदेशी परत आले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी लहान वयातच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं.

वयाच्या ३३व्या वर्षी ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू झाले होते. या कुलगुरूंच्या पदावर नियुक्त होणारे ते सर्वात तरुण कुलगुरू होते. विचारवंत आणि हुशार शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी दिवसेंदिवस आपलं कर्तृत्व आणि कीर्ती वाढवतचं नेली. (Dr. Shyama Prasad Mukherjee)

(हेही वाचा- Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे ? अधिवेशनात चर्चा, कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना)

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वेच्छेने राजकारणात प्रवेश केला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे खऱ्या अर्थाने मानवतेचे उपासक आणि मानवतेचा सिद्धांत जपणारे होते. त्यांनी कित्येक काँग्रेस पक्षात सामील नसलेल्या हिंदूंच्या मदतीने कृषक प्रजा पक्षासोबत युती केली. त्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रवादी धोरणाकडे आकर्षित झाले आणि ते हिंदू महासभेत सामील झाले.

त्याकाळी मुस्लिम लीगच्या राजकारणामुळे बंगालचे वातावरण दूषित होत होते. जातीय विभाजनाची परिस्थिती होती. ब्रिटीश सरकार जातीयवादी लोकांना प्रोत्साहन देत होते. अशा कठीण परिस्थितीत बंगालच्या हिंदूंची उपेक्षा होणार नाही याची जबाबदारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांनी उचलली. आपल्या अनोख्या रणनीतीने त्यांनी त्यावेळी बंगालची फाळणी करण्याचे मुस्लिम लीगचे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडले. १९४२ साली ब्रिटीश सरकारने विविध राजकीय पक्षांच्या सर्व लहान-मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्यांत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा होते.

(हेही वाचा- Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट!)

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) हे सांस्कृतिकदृष्ट्या आपण सर्व एक आहोत या विचाराचे समर्थक होते. त्यामुळे धर्माच्या आधारे विभाजन करण्याला त्यांचा विरोध होता. फाळणीची परिस्थिती ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांमुळे निर्माण झाली होती असं त्यांचं मत होतं. आपण सर्व एक आहोत हेच मूलभूत सत्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपली एक भाषा, एक संस्कृती आणि एकच वारसा आहे असं ते म्हणायचे. पण त्यांच्या विचारांचा प्रचार इतर राजकीय पक्षांच्या तत्कालीन नेत्यांनी वेगळ्या स्वरूपात केला. तरीही लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार प्रेम आणि आदर वाढला.

ऑगस्ट १९४६ साली मुस्लीम लीगने युद्धाचा मार्ग पत्करला आणि कलकत्त्यात अतिशय रानटी आणि अमानुष हत्याकांड घडवले गेले. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सामूहिकरीत्या घाबरले होते. काँग्रेस नेत्यांनी जनतेला दिलेली अखंड भारताबाबतची आश्वासनं बाजूला ठेवून ब्रिटीश सरकारचा भारताच्या फाळणीचा गुप्त कट मान्य केला. त्यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांनी बंगाल आणि पंजाबच्या फाळणीची मागणी उचलून धरली. त्यानंतर पाकिस्तानची फाळणी करून अर्धा बंगाल आणि अर्धा पंजाब विभाजित भारतासाठी वाचवला गेला.

(हेही वाचा- Chhattisgarh: विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू, विषारी वायू गळतीमुळे गमावला जीव; एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले…)

गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या विनंतीवरून ते भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात सामील झाले. उद्योग खात्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. संविधान सभा आणि प्रांतीय संसदेचे सदस्य तसेच केंद्रीय मंत्री म्हणून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांनी लवकरच आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीमुळे त्यांचे इतर नेत्यांशी मतभेद तसेच राहिले. परिणामी, त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. कारण राष्ट्रीय हितसंबंधांना आपली सर्वोच्च प्राथमिकता द्यावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. त्यावेळी तो पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. भारतीय जनसंघ हा पक्ष ऑक्टोबर १९५१ साली स्थापन करण्यात आला.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांना जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनवायचा होता. त्यावेळी जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र ध्वज आणि स्वतंत्र राज्यघटना होती. भारताच्या संसदेत केलेल्या भाषणात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी कलम ३७० रद्द करण्याचीही जोरदार मागणी केली होती. ऑगस्ट १९५२ साली जम्मूमधल्या एका विशाल रॅलीमध्ये त्यांनी संकल्प केला होता की, ‘एकतर मी तुम्हाला भारतीय संविधान मिळवून देईन किंवा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देईन.’

(हेही वाचा- Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!)

त्यांनी तत्कालिन नेहरू सरकारला आव्हान दिले आणि ते आपल्या निर्धारावर ठाम राहिले. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी ते १९५३ साली परवानगी न घेता जम्मू-काश्मीरच्या प्रवासाला निघाले. पण तेथे पोहोचताच त्यांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आलं. २३ जून १९५३ साली रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यू झाला. (Dr. Shyama Prasad Mukherjee)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.