- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav’s Catch) टिपलेला झेल सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात, आफ्रिकन संघाला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. डेव्हिड मिलर फंलदाजी करत होता. त्याने हार्दिक पांड्याचा पहिलाच चेंडू लाँग – ऑफला टोलवला. तिथे सूर्यकुमार यादव उभा होता. चेंडू सीमारेषेपलीकडेच जात होता. इतक्यात चमत्कार झाला. सूर्यकुमारने आधी चेंडू सीमारेषपलीकडे हवेत झेलला, तो मैदानात टाकला. आणि मग स्वत; मैदानात परत येत तो चेंडू झेलला. तेव्हाही त्याचा तोल जात होता. पण, त्याने स्वत:ला सावरलं. मिलर हताशपणे पाहात राहिला. पण, त्याला मैदान सोडावं लागलं. (Suryakumar Yadav’s Catch)
(हेही वाचा- ३७० कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देणारे जननायक Dr. Shyama Prasad Mukherjee)
या झेलामुळेच भारताचा विजय शक्य झाला. पण, त्यावर वादही निर्माण झाले. रिप्लेमध्ये सूर्यकुमारचा पाय सीमारेषेला लागला आहे का, याची तपासणी करताना तिथे एक पुसट झालेली पांढरी रेषा दिसते. ती सीमारेषेची होती आणि सीमारेषेवरील दोरी ही मागे ढकलली होती, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. एका ऑस्ट्रेलियन स्तंभलेखकाने तर तसा लेखही लिहिला. (Suryakumar Yadav’s Catch)
Thoes who doubted Surya Kumar Yadav catch should watch this video.
Its a proof of cleanest catch. pic.twitter.com/C8FiJotir7
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) July 4, 2024
या ऑस्ट्रेलियान स्तंभलेखकावर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती सोडली, तर कुणीही त्या झेलावर शंका घेतलेली नाही. प्रत्येत व्हीडिओ रिप्लेमध्ये स्कायने व्यवस्थित झेल घेऊन शरीराचं संतुलनही राखलेलं दिसत आहे. हा झेल भन्नाट होता. या झेलाबद्दल कुजबूज झाली. पण, उघडपणे फक्त एका लेखकाने लिहिलं आहे. त्या लेखकाने एकदा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये फसवणूक केल्याचे १० प्रसंग हा व्हीडिओ पाहावा,’ असा टोमणाही सुनील गावसकर यांनी मारला आहे. (Suryakumar Yadav’s Catch)
(हेही वाचा- Rain Alert : मुसळधार पावसामुळे ऋषिकेश ते बद्रीनाथ महामार्ग बंद; अमरनाथ यात्रा थांबवली)
सूर्यकुमारने झेल पकडला तेव्हा दिसणारी पुसट पांढरी रेषा ही आधीच्या सामन्यातील जुनी सीमारेषा होती, असं स्पष्ट झालं आहे. तर घेतलेला झेल हा योग्यच होता, असा आयसीसी पंचांनीही निर्वाळा दिला आहे. (Suryakumar Yadav’s Catch)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community