- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारताच्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याने १५३ धावांच्या स्ट्राईकरेटने १४४ धावा आणि ११ बळी घेतले. या स्पर्धेत सूर गवसेपर्यंत मागचे ६ महिने चांगलेच आव्हानात्मक पण, मनोरंजनाचेही होते, असं हार्दिकने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलून दाखवलं. एकदिवसीय विश्वचषकात झालेल्या दुखापतीतून तो सुरुवातीला सावरत होता. तो मैदानावर परतला तर आयपीएलमध्ये तो जिथे जाईल तिथे प्रेक्षक त्याची हूर्यो उडवत होते. (Hardik Pandya to PM Narendra Modi)
(हेही वाचा- Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात आणखी २५ मूर्ती बसवण्यात येणार!)
काहीवेळा हार्दिक वैतागलेला दिसला. पण, त्याने मनावरील नियंत्रण नाही सोडलं. टी-२० विश्वचषकात त्याने ‘आता बॅटच बोलेल,’ या बाण्याने फलंदाजी केली. आयपीएलच्या अख्ख्या हंगामात हार्दिकला सोशल मीडिया आणि मैदानातही चाहत्यांचा रोष पत्करावा लागला होता. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ प्रशासनाने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) विकत घेतलं. रोहीतच्या ऐवजी कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती केली. मुंबई फ्रँचाईजीच्या चाहत्यांना मात्र रोहित शर्माच (Rohit Sharma) कर्णधार हवा होता. हार्दिकला त्यांचा राग झेलावा लागला. (Hardik Pandya to PM Narendra Modi)
‘या टीकेतही मी मानसिक संतुलन आणि धैर्य ढळू दिलं नव्हतं. हातून चांगली कामगिरी होणं महत्त्वाचं होतं. त्यावरच लक्ष केंद्रीत केलं,’ असं हार्दिक पंतप्रधान नरेंद्र मोदींशी याबाबतीत बोलताना म्हणाला.
#WATCH | During his interaction with PM Modi, Cricketer Hardik Pandya said, “…Last 6 months have been very entertaining for me, there have been a lot of ups and downs and the public booed me. A lot of things happened and I always felt that if I give any answer, it would be… pic.twitter.com/bzti1hNUKu
— ANI (@ANI) July 5, 2024
अख्ख्या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाचं मनोबल कसं होतं आणि संघात काय घडत होतं, याचा आढावा हार्दिकने पंतप्रधानांशी बोलताना घेतला. ‘मागचे सहा महिने माझ्यासाठी खूपच मनोरंजक होते. बरंच काही घडलं. माझी प्रेक्षकांकडून हेटाळणी झाली. कामगिरीत चढउतार होते. पण, मी माझं लक्ष खेळापासून ढळू दिलं नाही. याला उत्तर द्यायचं ते खेळातूनच, असं मी ठरवलं होतं,’ असं हार्दिक पंतप्रधान मोदींशी बोलताना म्हणाला. (Hardik Pandya to PM Narendra Modi)
(हेही वाचा- Rain Alert : मुसळधार पावसामुळे ऋषिकेश ते बद्रीनाथ महामार्ग बंद; अमरनाथ यात्रा थांबवली)
आव्हानांचा कठोरपणे मुकाबला केल्याबद्दल पंतप्रधानांनी हार्दिकचं कौतुक केलं. हार्दिक पांडयाने अंतिम फेरीत धोकादायक दिसणाऱ्या हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) आणि डेव्हिड मिलर (David Miller) या दोघांचा बळी मिळवला. २२ धावांत त्याने ३ बळी मिळवले. (Hardik Pandya to PM Narendra Modi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community