Champions Return Home : ‘झेल नीट बसला नसता, तर तुला घरी बसवलं असतं’, – रोहितने उडवली सूर्यकुमार यादवची टर 

Champions Return Home : टी-२० विश्वचषक विजेत्या ४ मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला

163
Champions Return Home : 'झेल नीट बसला नसता, तर तुला घरी बसवलं असतं', - रोहितने उडवली सूर्यकुमार यादवची टर 
Champions Return Home : 'झेल नीट बसला नसता, तर तुला घरी बसवलं असतं', - रोहितने उडवली सूर्यकुमार यादवची टर 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषकातील विजयामुळे देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. या संघातील ४ खेळाडू हे मुंबई, महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal) यांचा सत्कार समारंभ विधानभवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या खास शब्दात भाषण केले. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झेलवरुन केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. (Champions Return Home)

(हेही वाचा- Suryakumar Yadav’s Catch : सूर्यकुमारच्या झेलावरून बोलणाऱ्यांना सुनील गावस्करनी सुनावलं…)

सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अंतिम सामन्यातील त्या झेलाबद्दल विचारलं गेलं. ‘झेल घेतला नाही. तो हातात बसला,’ असं सूर्या त्यावर म्हणाला. तेव्हा तिथेच उभ्या असलेल्या रोहीतने मिश्किलपणे म्हटलं, ‘बरं झालं झेल बसला. नाहीतर तुला घरी बसवलं असतं.’ (Champions Return Home)

Insert tweet – https://twitter.com/UddhavKumthekar/status/1809219482696757535

सर्वांना माझा नमस्कार.. इथं बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार… आमच्यासाठी असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार… काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. २०२३ मध्ये संधी थोडक्यात हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही… सर्वांमुळे हे शक्य झालं. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता.बरं झालं सूर्यकुमार यादव याच्या हातात झेल बसला नाहीतर त्याला मी पुढे घरी बसवलं असतं. सर्वांचे खूप खूप आभार… (Champions Return Home)

इथं असलेल्या सर्वांना भेटून चांगले वाटते.  हा प्रसंगही मी कधीच विसरु शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार… माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत, असं सूर्या म्हणाला.  सुर्यकुमार यादवने यावेळी मुंबई पोलिसांचं कौतुक केले. त्याशिवाय आपण आणखी एका विश्वचषक नावावर करु, असा विश्वास व्यक्त केला. अखेरच्या षटकातील झेलबद्दल बोलताना सूर्यकुमार (Suryakumar Yadav) म्हणाला की… झेल हातात बसला… (Champions Return Home)

(हेही वाचा- Tunnel Between Vasai To Thane: आता वसई ते ठाणे प्रवास होणार सूकर! जाणून घ्या काय आहे हा प्रकल्प?)

या चार खेळाडूंबरोबरच संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक आणि माजी मुंबईकर खेळाडू पारस म्हांब्रे (Paras Mhambre) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath Shinde) शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते. रोहीत, सूर्यकुमार आणि यशस्वी (Yashasvi Jaiswal) यांनी मराठीत संवाद साधला. (Champions Return Home)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.