Indian Armyच्या ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या एके – २०३ रायफल्सची काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…

रशियन कंपनीसोबत केलेल्या भागीदारीनुसार पहिल्या टप्प्यातील रायफलनिर्मितीचे काम पूर्ण झाले आहे.

140
Indian Armyच्या ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या एके - २०३ रायफल्सची काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या...

भारतीय लष्कराच्या (Indian Army) ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या ३५ हजार एके -२०३ रायफली दाखल करण्यात आल्या आहेत. या रायफलीमधून एका मिनिटाला ७०० राऊंड फायर करता येणार असून, युद्धात या रायफलींचा वापर करण्यात येणार आहे.

भारत आणि रशियातील (India, Russia) संयुक्त भागीदारीतील ‘आयआरआरपीएल’ या कंपनीने या रायफलची निर्मिती केली आहे. या कंपनीने या असॉल्ट रायफलींची डिलव्हरी भारतीय लष्कराकडे केली आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत या रायफलींची निर्मिती २०२१पासून करण्यात आली आहे. ही रायफल वजनाला हलकी असून, ती कधीच जाम होत नाही. एका मिनिटात ७०० गोळ्या फायर करण्याची क्षमता या रायफलची आहे.

(हेही वाचा – Kerala Brain-Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला चौथा बळी! )

रशियन कंपनीसोबत केलेल्या भागीदारीनुसार पहिल्या टप्प्यातील रायफलनिर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. एके-२०३ सीरिजमधील असॉल्ट रायफलची निर्मिती करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. भारतीय लष्करात सध्या ७.६x ३९ एमएम काडतुसासाठी तयार करण्यात आलेल्या एके -२०० श्रेणीतील रायफली वापरल्या जातात. या श्रेणीतील अद्ययावत आवृत्ती म्हणून एके-२०३ रायफलीकडे पाहिले जाते. या रायफली स्वयंचलित आहेत.

भारतीय संरक्षण दलात १९९६ पासून इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टिम (इन्सास) या रायफलीचा वापर केला जातो. सध्या संरक्षण दलात ७ ते ८ लाख इन्सास रायफली आहेत. या रायफलीपेक्षा एके -२०३ दर्जेदार आणि घातक आहेत. तिन्ही ऋतुंमधील कोणत्याही वातावरणाचा या रायफलींवर परिणाम होत नाही. वजन आणि लांबी कमी असल्याने युद्धात या रायफलींचा वापर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही कार्यकाळात संरक्षण दलाच्या मजबुतीकरणास प्राधान्य देण्यात आले आहे. एके -२०३ श्रेणीतील ७ लाख रायफली तयार करण्याचे काम कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये सुरू आहे. २०२१ साली भारत आणि रशियात या रायफलींच्या संयुक्त भागीदारीबाबत करार झाला होता.

संरक्षण उत्पादन १.२७ लाख कोटींवर…
संरक्षण दलातील शस्त्र सामग्रीचे उत्पादन २०२३-२४ साली १.२७ लाख कोटींवर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तत्पूर्वीच्या वर्षात हा आकडा १.०८ लाख कोटी होता. शस्त्रसामग्रीच्या निर्यातीमध्येही भारताने प्रगती केली असून, यावर्षी २१ हजार कोटींची निर्यात केली आहे.

काय आहे वैशिष्ट्य?

३५ हजार एके – २०३ रायफलीचे वैशिष्ट्य ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगताना ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी सांगितले की, भारतीय सैन्याचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे रायफल. भारतीय जवान युद्धावेळी रायफलचा वापर करतात. इतर क्षेपणास्रासारखी शस्रं खूप मोठी असतात. म्हणून त्याचा वापर हातात घेऊन करता येत नाही. सैनिकांकडे असलेलं वैयक्तिक शस्र (Personal Weapons) त्याला रायफल असं म्हणतात. हे शस्र चांगलं असेल, तर आपल्या सैन्याची लढण्याची क्षमता वाढू शकते. दुर्दैवाने याआधी आपल्याकडे हे शस्र प्रगत नव्हतं.

पुढे त्यांनी सांगितले की, १९६२च्या युद्धात आपल्याकडे जुन्या ३०३ रायफली होत्या. हे पराभवाचं मोठं कारण होतं, कारण त्यातून एका वेळी एकच गोळी फायर होत होती. त्यानंतर आलेल्या रायफलीही जड होत्या. शस्र हे हलकं, तीक्ष्ण आणि ज्याद्वारे जलद गतीने फायर होईल, असं हवं. या शस्रानंतर ‘इन्सास ५.५६’ नावाचं शस्र भारतीय सैन्याने भारतासाठी तयार केलं. हे शस्त्रसुद्धा फारसं उपयोगात आलं नाही. आता भारतीय सैन्यात दाखल झालेलं एके-२०३ हे सर्वात अत्याधुनिक असं छोटं शस्त्र आहे. या रायफली आता आपल्या भारतीय सैन्याला दिल्या जातील. भारतीय सैनिकांकडे वैयक्तिक शस्र (Personal Weapons) असायलाच हवं. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचं आहे. भारत आणि रशिया या देशांनी संयुक्त भागीदारीत या शस्त्र निर्मितीला २ वर्षांपूर्वी परवानगी दिली. शस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम आता सुरू झाला. ३५ ते ४० हजार Weapons सैन्यात आलीही आहेत.ती आता सैनिकांना दिली जातील, मात्र प्राथमिक स्तरावर ज्या भागात शस्राचा वापर सर्वात जास्त होतो उदा. काश्मिरमधील सैनिकांना ती आधी दिली जातील. त्यानंतर ईशान्य भारत म्हणजे मणिपूर आणि त्यानंतर ५-६ वर्षांत भारतीय सैन्य, आर्मी, नेव्ही दलातील सैनिकांनाही दिली जातील.

या रायफलींची निर्मिती मेक इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत होत आहे. या रायफलीची निर्मिती पूर्णपणे भारतात होणार आहे. दर्जा, रेंज, मेंटेनन्स या तीन्ही दृष्टीने हे शस्त्र चांगलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शस्त्रामध्ये जे गुण असणं आवश्यक असतं ते म्हणजे कमीतकमी खर्च, धारदार, नेम तीक्ष्ण हवा, एका पाठोपाठ एक जास्त गोळ्या रॅपिड फायरने फायर व्हायल्या हव्यात तसेच ते वाळवंट असो की, हिमालयाचा खालचा भाग. कुठल्याही भागात वापरता यायला हवं. या सर्व गुणांसाठी नवीन एके -२०३ हे शस्र पात्र आहे. जे अतिशय अष्टपैलू असं शस्त्र आहे. भारतीय सैन्यात अशी शस्रं दाखल झाल्यामुळे आपली शस्त्रसज्जता वाढेल. सैनिकांना याचा नक्कीच फायदा होईल. अशा तऱ्हेने येणाऱ्या काळात सगळ्या सैनिकांना ही शस्त्रं लवकरात लवकर दिली जातील. आपल्या मित्र देशांनाही हे शस्त्र आपण निर्यात करू शकतो, अशी माहिती ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.