Manipur Religious War: मणिपुरात धार्मिक स्थळावर गोळीबार; केंद्रीय दलाचे पथक तैनात

142
Manipur Religious War: मणिपुरात धार्मिक स्थळावर गोळीबार; केंद्रीय दलाचे पथक तैनात
Manipur Religious War: मणिपुरात धार्मिक स्थळावर गोळीबार; केंद्रीय दलाचे पथक तैनात

गुरुवारी-शुक्रवारी रात्री मणिपूरमधील इंफाळमध्ये (Manipur Imphal) एका निर्माणाधीन धार्मिक स्थळाला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. पॅलेस कंपाऊंडमधील धार्मिक स्थळावर रात्री 12.30 च्या सुमारास हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत सहभागी असलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. गोळीबार झालेल्या धार्मिक स्थळाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे एक पथक (CRPF) तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात एकाही जवानाला इजा झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. (Manipur Religious War)

(हेही वाचा – Crime News: डॉक्टरांचा हलगर्जीपणा महिलेच्या जीवावर बेतला! तोंडात बोळा घालून महिलेचं निर्दयीपणे ऑपरेशन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (3 जुलै) राज्यसभेत सांगितले होते की, मणिपूरमध्ये हिंसाचार सातत्याने कमी होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 11,000 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यात पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. राज्यातील मेईतेई (Meitei Society) आणि कुकी-झोमी जमातींमध्ये (Kuki-Zomi tribe) 3 मे 2023 पासून तणाव सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 65 हजारांहून अधिक लोकांनी घरे सोडून इतरत्र आश्रय घेतला आहे. (Manipur Religious War)

मेईतेई महिला गेल्या एक वर्षापासून रात्रभर जागून गावाचे रक्षण करत आहेत

मणिपूरचे लोक गेल्या 14 महिन्यांपासून शांतता प्रस्थापित होण्याची वाट पाहत आहेत. संपूर्ण मणिपूर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, मेईतेई आणि कुकी. अनेक मेईतेई स्त्रिया आपल्या गावाचे रक्षण करण्यासाठी रात्रभर जागे राहतात, तर कुकीबहुल भागात सरकारी काम काही महिन्यांपासून ठप्प आहे. मणिपूरमध्ये इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, कक्चिंग आणि थौबल व्हॅली प्रदेश असे 5 जिल्हे आहेत. या पाच जिल्ह्यांचा सीमावर्ती भाग अजूनही असुरक्षित आहे. इम्फाळ खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील फयेंग आणि सेकमाई भाग, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील यिंगंगपोकपी भागाच्या पलीकडे जाण्यास मनाई आहे. (Manipur Religious War)

(हेही वाचा – Kerala Brain-Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला चौथा बळी!)

त्याचप्रमाणे बिष्णुपूर जिल्ह्यातील फौगाकचाओ इखाई आणि थौबल जिल्ह्यातील येरीपोक परिसरात जाण्यास मनाई आहे. कुकी क्षेत्र या पलीकडे सुरू होते. येथील लोकांवर अनेकदा तुरळक हल्ले होतात. रस्त्याच्या कडेला छावणीत बसलेल्या महिला गावाचे रक्षण करत आहेत. (Manipur Religious War)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.