नीट-यूजी काऊन्सलिंग (NEET-UG Counselling) पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएम आणि बीडीएस अंडरग्रॅज्यूएट मेडिकल कोर्सेची प्रवेश प्रक्रिया त्यामुळे सुरू राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेसंदर्भात वातावरण तापलं आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीदेखील सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे.
नीट-यूजी काऊन्सलिंग आयोजित करणाऱ्या मेडिकल काऊन्सिल कमिटीने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. पण, कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय याबाबत समितीने सांगितलेले नाही. यासंदर्भात एमसीसी लवकर पुढील सूचना जारी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – Crime News: डॉक्टरांचा हलगर्जीपणा महिलेच्या जीवावर बेतला! तोंडात बोळा घालून महिलेचं निर्दयीपणे ऑपरेशन )
नीट- यूजी काऊन्सलिंग ६ जुलै रोजी होणार होती, पण अचानक यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी सुप्रीम कोर्टातील ८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी २ वेळा नीट-यूजी स्थगित करण्याची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आली होती. पण, कोर्टाने काऊन्सलिंगवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, आम्ही काऊन्सलिंगवर स्थगिती आणू शकत नाही. कारण परीक्षा सुरू आहेत.
५ मे रोजी झालेल्या नीट -यूजी परीक्षेमध्ये अनियमितता आढळून आली होती. एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले होते. तसेच, पैसे घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नीट-यूजी काऊन्सलिंग काय आहे?
भारतात मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन काऊन्सलिंगची प्रक्रिया आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET-UG परीक्षा पास केली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एमसीसी दरवर्षी ऑनलाईन नीट यूजी काऊन्सलिंगचे चार राऊंड आयोजित करते.
हेही पहा –