PM Modi to Neeraj Chopra : पंतप्रधान जेव्हा नीरजला म्हणतात, ‘तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे’

ऑलिम्पिकला निघालेल्या खेळाडूंना पंतप्रधानांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या

142
PM Modi to Neeraj Chopra : पंतप्रधान जेव्हा नीरजला म्हणतात, ‘तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे’
PM Modi to Neeraj Chopra : पंतप्रधान जेव्हा नीरजला म्हणतात, ‘तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे’
  • ऋजुता लुकतुके

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी निघालेल्या भारतीय खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानी बोलावून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांसाठी गुरुवारचा दिवस क्रिकेट संघाच्या भेटीचा. तर शुक्रवारचा दिवस ऑलिम्पिकला निघालेल्या ॲथलीटना भेटण्याचा होता. यामध्ये टोकयो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राही होता. आणि बॅडमिंटन चमूही होता. नरेंद्र मोदींनी नीरजला मिश्किलपणे एका जुन्या गोष्टीची आठवण करून दिली. (PM Modi to Neeraj Chopra)

नीरजचं राज्य असलेल्या हरयाणातील चुरमा हा पदार्थ मोदींचाही आवडता आहे. आणि इथे नीरजशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘माझा चुरमा अजून मला मिळाला नाही.’

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) पंतप्रधानांना म्हणाला, ‘मागच्या वेळी दिल्लीतला साखरेत बनलेला चुरमा तुम्हाला खिलवला होता. यावेळी हरयाणाचा आणतो तुमच्यासाठी. तो खरा चुरमा असतो.’ यावर मोदींनी पटकन उत्तर दिलं, ‘यावेळी तुमच्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे.’ नीरजही त्यावर मनमोकळेपणाने हसला. मोदींना घरगुती चुरम्याची चव हवी होती. आणि संभाषणही घरगुती स्तरावर नेण्यात पंतप्रधान माहीर आहेत. (PM Modi to Neeraj Chopra)

(हेही वाचा – Indian Armyच्या ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या एके – २०३ रायफल्सची काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…)

या घरगुती संभाषणानंतर मोदींनी नीरज चोप्रा आणि जमलेल्या इतर खेळाडूंच्या तंदुरुस्तीची विचारपूस केली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘खेळाडूंनी तंदुरुस्त आणि दुखापतींपासून दूर रहावं. मनाने कणखर रहावं,’ असं पंतप्रधान सगळ्यांना उद्देशून म्हणाले. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास जागवण्‌याचं काम पंतप्रधानांनी आपल्या वागण्याने आणि भाषणाने केलं. पदकापेक्षा सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची. त्यातून देशाला नक्की पदकं मिळतील, असं मोदी म्हणाले. (PM Modi to Neeraj Chopra)

येत्या २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार आहे. आणि भारतीय खेळाडू हळू हळू परदेशात प्रशिक्षणाला किंवा सरावासाठी जाणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधानांच्या भेटीचा हा कार्यक्रम नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.