हिंदुद्वेषी Maharaj Filmला जगभरात प्रसिद्धी मिळण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ने घेतली इस्लामी देशांची मदत

‘महाराज’ (Maharaja Film) या चित्रपटावर गुजरात उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती उठवल्यानंतर २१ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

189

अभिनेता अमीर खान याचा मुलगा  जुनैद खान याने अभिनय केलेल्या ‘महाराज’ चित्रपटात (Maharaj Film) हिंदू संताला खलनायक दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाला विरोध होऊ लागला आहे. मात्र आता हा चित्रपट जगभरात पोहचावा यासाठी ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी’वर प्रसारण करणार्‍या कंपनीला भारताच्या २ शेजारी इस्लामी देशांचे विशेष साहाय्य मिळाले आहे.

‘महाराज’ चित्रपटाला (Maharaj Film) जागतिक क्रमवारीत आणण्यासाठी ‘नेटफ्लिक्स’ने पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतील सामाजिक माध्यमांवर त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे. हा चित्रपट सर्वाधिक पाहिला जात असलेल्या १४ देशांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे. ‘महाराज’ या चित्रपटात हिंदु संताला खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. यामुळे या चित्रपटाला भारतातील हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.

(हेही वाचा Indian Armyच्या ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या एके – २०३ रायफल्सची काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…)

‘महाराज’ (Maharaj Film) या चित्रपटावर गुजरात उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती उठवल्यानंतर २१ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला भारतीय माध्यमांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. भारताव्यतिरिक्त हा चित्रपट सध्या पाकिस्तान, बांगलादेश आणि मालदीव येथे पहिल्या क्रमांकावर आहे. बहरीन, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद याला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी ही संपूर्ण रणनीती अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.