Water Cut : मुंबईकरांवर पाणीकपात, पण इमारत बांधकामांना मुबलक पाणी, भाजपाने केली ही मागणी

2321
Water Cut : मुंबईकरांवर पाणीकपात, पण इमारत बांधकामांना मुबलक पाणी, भाजपाने केली ही मागणी
Water Cut : मुंबईकरांवर पाणीकपात, पण इमारत बांधकामांना मुबलक पाणी, भाजपाने केली ही मागणी

विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईत मागील ५ जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली. परंतु एरव्ही अशाप्रकारे कपात लागू करताना भविष्यातील पाण्याच्या वापरात काटकसर करण्याच्यादृष्टीकोनातून बांधकाम व्यावसायिक तसेच तरण तलावांसह पंच तारांकित हॉटेल आणि इतर वापराच्या पाणी वापरावर निर्बंध घातले जातात. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या भांड्यातील पाणी कमी करताना बांधकामांच्या ठिकाणी मात्र महापालिकेचा पाणी पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे निर्माणधीन बांधकामांच्या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी आता होत आहे. (Water Cut)

तलावांमधील पाणी साठा अत्यंत कमी

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलाव आणि धरणांमधील पाणी साठा यंदा कमी झाल्याने ३१ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका जलअभियंता विभागाने ३० मे २०२४ पासून ५ टक्के आणि ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली. परंतु तलावांमधील पाणी साठा अत्यंत कमी असल्याने सर्वसामान्य जनतेच्या पाण्यात कपात करतानाच इतर व्यावसायिक वापराच्या पाण्यातही मोठ्याप्रमाणात निर्बंध तसेच कपात जारी केली जाते. (Water Cut)

(हेही वाचा – राजकीय वजन वाढवण्यासाठी Nana Patole क्रिकेटच्या मैदानात)

सर्वसामान्य जनतेला पाण्यावर निर्बंध

परंतु ही कपात जाहीर करताना महापालिका प्रशासनाने तरण तलावांचे पाणी पुरवठा बंद करण्याची कोणतीही घोषणा केली नाही, तसेच बांधकामांच्या ठिकाणी केवळ पिण्याकरता पाणी पुरवठा करून इतर जलवाहिन्यांना टॅप लावण्याचे काम केले नाही. तसेच पंचतारांकित हॉटेल्स सह व्यावसायिक वापराच्या पाण्यावर कपातीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पाण्यावर निर्बंध आणताना इमारत बांधकामांना मात्र बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे.(Water Cut)

तलावातील पाणी पातळीत वाढ होईपर्यंत

मुंबईत सध्या सुमारे २५०० हून अधिक इमारतींचे बांधकाम सुरु असून या इमारत बांधकामांमध्ये महापालिकेच्यावतीने आजही सुरळीत पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली असून याची दखल घेऊन भाजपाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांना निवेदन पाठवून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी पातळीत वाढ होईपर्यंत मुंबईतील इमारत बांधकामांना महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – BJPने केल्या निवडणूक प्रभारींच्या जंबो नियुक्त्या; महाराष्ट्रातील नेत्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी)

मुंबईत इमारतींची बांधकामे जोरात

मुंबईकरांना सध्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत असून सर्वसामान्य जनतेला पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागत असतानाच मुंबईत बांधकामांसाठी मोठ्याप्रमाणात पाणी वापरले जात आहे. मुंबईतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण असतानाच मुंबईत इमारतींची बांधकामे जोरात सुरु आहेत. त्यमुळे जोपर्यंत योग्य प्रमाणात पाऊस पडून तलावात पाण्याची पातळी वाढून साठा वाढत नाही तोवर मुंबईतील इमारतीतील इमारत बांधकामांना महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात यावा असे शिरवडकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.