‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात शनिवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर (Neera Sthan) माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माऊलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाली. तत्पूर्वी नीरा नदीच्या पवित्र पात्रात माऊलींच्या पादुकांना (Dnyaneshwar Mauli Paduka) स्थान घालण्यात आले. (Ashadhi Wari 2024)
(हेही वाचा – Edible oil tanks: मुंबईच्या उदरात विकसित करणार ‘खाद्यतेला’च्या टाक्या!)
दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पालखी सोहळ्याने जुन्या नीरा पुलावरून दत्तघाटावर प्रवेश केला. टाळ-मृदंगाच्या जयघोषाबरोबर माऊलींच्या पादुका स्नानासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळीबरोबर वाद्यांचा निनाद सुरू होता. पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांना स्नान घातले गेले. यानंतर प्रशासनातर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. (Ashadhi Wari 2024)
(हेही वाचा – PM Modi to Neeraj Chopra : पंतप्रधान जेव्हा नीरजला म्हणतात, ‘तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे’)
भाविकांची गर्दी
राजाभाऊ आरफळकर (Rajabhau Arfalkar) यांनी माऊलींच्या पादुका निरा स्नानासाठी नेल्या. त्यावेळी उपस्थित असंख्य भाविकांनी माऊलीं माऊलीं नामाचा जयघोष करीत माऊलींना निरा स्नान घातले. त्यानंतर दत्त मंदिराच्या वतीने माउलींची पूजा करण्यात आली व पादुका पुन्हा पालखी रथामध्ये विराजमान झाल्या आणि सोहळा सातारा जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्यानंतर पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा गावाच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. माऊलींच्या दर्शनासाठी पालखी तळावर परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (Ashadhi Wari 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community