-
ऋजुता लुकतुके
टी २० विश्वचषक जिंकल्यावर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीनंतर भारतीय संघ मुंबईत दाखल झाला. मुंबईत नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूकही काढण्यात आली. या सगळ्या सोहळ्यात दीड महिना घराबाहेर राहिलेल्या खेळाडूंना त्यांच्या घरीही जाता आलं नव्हतं. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मिरवणुकीनंतर रात्री उशिरा वांद्रे इथं त्याच्या घरी पोहोचला.
इथंही त्याने नातेवाईक आणि मित्रांनी त्याचं जंगी स्वागत केलं. त्याचे बालमित्र स्वागतासाठी हजर होते आणि एका रांगेत उभं राहून त्यांनी रोहितला कौतुक आणि अभिनंदनाची सलामी दिली.
(हेही वाचा – Ashadhi Wari 2024: ‘ज्ञानोबा माऊली’च्या गजरात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान; लोणंदमध्ये विसावली पालखी)
𝑨 𝑪𝒉𝒂𝒎𝒑𝒊𝒐𝒏𝒔 𝑾𝒆𝒍𝒄𝒐𝒎𝒆 – Part 1️⃣ ft Childhood Friends 💙#TeamRo #RohitSharma @ImRo45 pic.twitter.com/sSXJb68XRr
— Team45Ro (@T45Ro) July 4, 2024
रोहितच्या घरी झालेल्या स्वागताचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) कुटुंबीय, त्याचे बालपणीचे मित्र आणि मुंबई इंडियन्समधील सहकारी तिलक वर्मा उपस्थित होते. रोहित शर्मा (Rohit Sharma) असं नाव लिहिलेले फोटो आणि टीशर्ट रोहितच्या मित्रांनी घातले होते. रोहितच्या स्वागतासाठी त्यांनी डान्स केला. यानंतर त्यांनी हिटमॅनला खांद्यावर उचलून घेत वर्ल्ड कप विजयाचं स्वागत केलं.
भारतीय संघाने २००७ नंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही संघात रोहित शर्मा (Rohit Sharma) होता. दोन्ही विजेतेपदांचा साक्षीदार असलेला रोहीत हा एकमेव क्रिकेटपटू आहे. २००७ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community