सर्वोच्च न्यायालयाने या आधीच मला क्लीन चीट दिली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या वरील पाचशे कोटी रुपयांच्या कथित हॉटेल भूखंड घोटाळ्याची चौकशी बंद करावी, असा क्लोजर रिपोर्ट कोर्टात दिला आहे. यावर विरोधकांनी भाजप, केंद्र व राज्य सरकार आणि रवींद्र वायकर यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना भाजपवाले आता दाऊदला इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचे शिल्लक राहिले आहेत, अशी जोरदार टिका उबाठा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
(हेही वाचा Hamas Israel War थांबण्याच्या वाटेवर? कुणी केली मध्यस्थी?)
यावर रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राऊत यांना जे बोलायचे आहे त्याबद्दल मी काय बोलू? राऊत काहीही बोलायला मोकळे आहेत. वेळ कशी कोणावर येते हे सांगू शकत नाही. मला सर्वोच्च न्यायालयातून आधीच क्लिन चिट मिळाली होती, असाही दावा रवींद्र वायकर यांनी केला.
Join Our WhatsApp Community