Income Tax Returns : क्रेडिट कार्डने आयकर कसा भरायचा?

अलीकडे डिजिटल युगात ऑनलाईन पद्धतीने आयकर भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत

150
Income Tax Returns : क्रेडिट कार्डने आयकर कसा भरायचा?
Income Tax Returns : क्रेडिट कार्डने आयकर कसा भरायचा?
  • ऋजुता लुकतुके

३१ जुलै ही आयकर विवरणपत्र (Income Tax Returns) भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि त्यापूर्वी आपल्याला मिळकतीवरील देय आयकर भरायचा असतो. एरवी किती आयकर देणं लागतो याचं गणित करून आयकर नजिकच्या बँकेत भरावा लागत होता. पण, आता डिजिटल युगात ऑनलाईन आयकर भरण्याचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. इतकंच नाही तर रोख रकमेची अडचण असेल तर त्यावर तात्पुरता उपाय म्हणून आात क्रेडिट कार्डानेही आयकर भरण्याची सोय झाली आहे. शिवाय क्रेडिट कार्ड वापरावर तुम्हाला प्रवास, शॉपिंग याच्यात सवलतीही मिळू शकतात. एकरकमी आयकर भरल्यामुळे तुमचे रिवॉर्ज पॉइंट्स वाढतात ज्याचा उपयोग तुम्हाला इतर ठिकाणी करता येतो.

अर्थ मंत्रालयाने २० मे २०२१ ला ऑनलाईन आयकर (Income Tax Returns) विवरणपत्र भरण्यासाठी पोर्टल सुरू केलं आहे. इथं तुम्हा ऑनलाईन विवरणपत्र आणि आयकरही भरू शकता. आयकराविषयीच्या इतरही गोष्टी इथं तुम्ही ऑनलाईन करू शकता. यात आणखी एक सुविधा म्हणजे तुम्ही आयकर क्रेडिट कार्डाने भरू शकता.

(हेही वाचा – Ashadhi Wari 2024: ‘ज्ञानोबा माऊली’च्या गजरात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान; लोणंदमध्ये विसावली पालखी)

क्रेडिट कार्डामुळे तुमच्याकडे पैसे भरण्याची लवचिकता राहते. आणि रोख पैसे नसतील तर त्यांची तात्पुरती सोय होते. कारणष क्रेडिट कार्डावर तुम्हाला ते पैसे भरण्यासाठी किमान ४५ दिवसांची मुदत मिळते. शिवाय क्रेडिट कार्डाने पैसे भरल्यास तुम्हाला आयकर भरल्याची ताबडतोब पावती मिळते. आणि ही पावती त्याचक्षणी आयकर विभागाकडेही पोहोचते. त्यामुळे आयकर विवरणपत्राची प्रक्रिया सोपी होऊन जाते. (Income Tax Returns)

आता क्रेडिट कार्डावर आयकर भरण्याची प्रक्रिया समजून घेऊया,

तुम्हाला www.incometax.gov.in या वेब पोर्टलवर जायचं आहे. तुम्ही यापूर्वी नोंदणी केलेली नसेल तर तुमचा पॅन क्रमांक व इतर माहिती भरून तुम्हाला आधी इथं एक खातं उघडावं लागेल. आणि ते उघडल्यावर युजर आयडी, पासवर्ड़ आणि वन-टाईम पासवर्ड वापरून तुम्हाला लॉग – इन करावं लागेल. हा वन-टाईम पासवर्ड तुम्ही नोंदणी केलेल्या फोन नंबरवरच येईल याची नोंद घ्या.

लॉग-इन केल्यावर ‘ई-पे टॅक्सेस’ या सदरात तुम्हाला जायचं आहे. आणि तिथे स्टार्ट बटन दाबायचं आहे. आणि पुढे ज्या आर्थिक वर्षासाठी कर भरायचा असेल ते वर्ष निवडायचं आहे. तुमची इतर माहितीही बरोबर दिली गेली आहे ना याचा आढावा घ्या. त्यानंतर तुम्हाला पेमेंट मोडमध्ये क्रेडिट कार्डाचा पर्याय निवडायचा आहे. तुमच्याकडे असलेलं असं क्रेडिट कार्ड निवडा जिथे तुम्हाला चांगले रिवार्ड मिळू शकतील, तुम्ही देय असलेली आयकराची रक्कम क्रेडिट कार्डच्या मर्यादेत बसेल आणि त्या क्रेडिट कार्डावर ऑनलाईन पेमेंटची सोय असेल. तुम्ही क्रेडिट कार्डाचा पर्याय निवडल्यावर समोर विविध बँकांचे लोगो येतील. त्यातील तुमचं क्रेडिट कार्ड ज्या बँकेचं असेल तो लोगो/बँक तुम्ही निवडायची आहे. जर तुमची बँक इथं नसेल तर दुसरी बँक निवडली तरी चालेल. हा पेमेंट गेटवे आहे. (Income Tax Returns)

(हेही वाचा – Water Cut : मुंबईकरांवर पाणीकपात, पण इमारत बांधकामांना मुबलक पाणी, भाजपाने केली ही मागणी)

त्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्डाचा नंबर, सीव्हीसी, एक्सपायरीची तारीख अशी माहिती भरावी लागेल. एकदा तुम्ही भरलेली माहिती तपासून पाहा. आणि त्यानंतर पुढे जा. आता तुम्ही पे बटन दाबलंत की, पैसे चुकते होण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुम्ही क्रेडिट कार्ड घेताना सुरक्षित पेमेंटसाठी ज्या अटी ठेवल्या असतील (ओटीपी, वैयक्तिक फोन) त्यांची पूर्तता केलीत की, तुमची आयकर भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. आयकर विभागाच्या पोर्टलवर तुम्हाला ताबडतोब पावतीही मिळेल. (Income Tax Returns)

क्रेडिट कार्डाने आयकर भरल्यावर तुमचं या कार्डाचं स्टेटमेंट नक्की तपासून पाहा. आयकर भरल्याची कन्व्हिनिअन्स शुल्क आणि प्रक्रिया शुल्क तुम्हाला भरावं लागलं असेल. ते किती आहे याची नीट माहिती घ्या. भरावं लागणारं शुल्क आणि मिळणारे रिवॉर्ड्स यांची तुलना करून क्रेडिट कार्डाने आयकर भरण्यात फायदा आहे का, हे तपासून पाहा. क्रेडिट कार्डाने आयकर भरण्याचे फायदे नक्की आहेत. पण, त्याचबरोबर कार्डाच्या अटी व शर्ती आधी समजून घेणं आवश्यक आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.