Water Supply : पाणी समस्या तरीही महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडण्यांची खैरात

2581
Water Supply : पाणी समस्या तरीही महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडण्यांची खैरात
Water Supply : पाणी समस्या तरीही महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडण्यांची खैरात
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठा कमी झाल्याने मुंबईकरांवर दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्याने कमी दाबाने आणि पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने जनता त्रस्त आहे. मात्र, मुंबईत पाण्याची समस्या तीव्र असतानाही महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने जलजोडण्या देण्याचे काम जोरात सुरु आहे. पाणीकपातीच्या काळात जलजोडण्या देण्यास बंदी असतानाही प्रशासनाकडून प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये जलजोडण्या देण्यात येत असून कमी प्रमाणात पाणी येत असल्याने रहिवाशी जुनी जलजोडणी बंद करून नवीन जलजोडणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि महापालिकेचे अधिकारी पाण्याची समस्या असतानाही या जलजोडण्या देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर पावसाळ्यात तलावातील पाणीसाठा वाढेपर्यंत पुढील पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीकोनात कपात लागू केली जाते. मागील ५ जूनपासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू केली असून आजवर जेव्हा जेव्हा कपात लागू करण्यात आली आहे तेव्हा तेव्हा नवीन जलजोडण्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे किंबहुना त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु यंदा पाण्याची तीव्र समस्या असतानाही अशाप्रकारे नवीन जलजोडणी देण्याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसून या कपातीमुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा (Water Supply) होतो. त्यामुळे जुन्या जलजोडणीतून योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक भागांमधील रहिवाशांकडून नवीन जोडणीसाठी प्रयत्न केले जात असून महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने नवीन जलजोडणी देण्याबाबत कोणत्याही प्रकारची आडकाठी घेतली जात नाही.

(हेही वाचा – PM Modi to Neeraj Chopra : पंतप्रधान जेव्हा नीरजला म्हणतात, ‘तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे’)

महापालिकेत सध्या प्रशासक राजवट असून यापूर्वी महापालिकेच्यावतीने कपात लागू केल्यानंतर जनतेला नवीन जलजोडणी दिली जात नव्हती. महापालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी असताना कपातीच्या काळात नवीन जलजोडणी देण्यात निर्बंध घालणाऱ्या प्रशासनाला आता नगरसेवक नसताना हे निर्बंध विसरत चालले आहे. जोगेश्वरीतील माजी नगरसेवक बाळा नर यांनी मुंबईकरांना सध्या पाणी मिळत नाही. पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली असतानाच महापालिकेचे अधिकारी मात्र नवीन जलजोडणी देत सुटले असल्याचे हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना सांगितले. काही भागांमध्ये कपातीमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. परंतु कमी पाणी येत असल्याने रहिवाशी आता जुनी जोडणी बंद करून त्या जागी नवीन जलजोडणी घेण्यासाठी अर्ज करत आहेत आणि प्रशासन त्यांना जोडणीही देत आहे. मी आतापर्यंत चार जलजोडण्या रोखल्या असून यासर्व अनधिकृतपणे जलजोडण्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाणीकपातीच्या काळात नवीन जलजोडणी दिली जात नाही तर मग महापालिका प्रशासन नवीन जलजोडणी कशी दिली जाते असा सवाल नर यांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.