नीट पेपर फुटी प्रकरणातील लातूरमधील (Latur) आरोपी जलील पठाण याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, दुसरा आरोपी संजय जाधव यास 2 दिवसांची सीबीआय कोठडी (CBI Custody) देण्यात आली आहे. दरम्यान, 2 जुलै रोजी संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि जलील पठाण (Jalil Pathan) या दोघांनाही 4 दिवसाची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पठाण यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर संजय जाधव यास 2 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली गेली. (NEET Exam)
(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने याआधीच दिलेली क्लीन चीट; Ravindra Waikar यांचा दावा)
मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल उघडकीस
दरम्यान, आता पोलिसांच्या तपासात नवीन माहिती उघडकीस आली असून आरोपी गंगाधर दिल्ली नव्हे तर आंध्र प्रदेशात काम करत आहे. बंगळुरूतील सीबीआयच्या टीमने त्याला अटक केली आहे. 10 विद्यार्थी आणि पालकांनी सीबीआयशी संपर्क साधून याबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. यात कशाप्रकारे संजय जाधव आणि जलील पठाण हे त्यांच्याकडून पैसे घेत होते. हे पैसे पुढे गंगाधरला पाठवले जायचे. त्यासाठी मध्यस्थ होता तो इराण्णा कोंगलवार. त्यामुळे, पोलिसांकडून संजय जाधव जलील पठाण आणि इराण्णा कोंगलवार यांचे बँक व्यवहार तपासण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. (NEET Exam)
(हेही वाचा – Maharashtra ला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार; १५व्या कृषी नेतृत्व समितीची घोषणा)
सीबीआयने मागितली कोठडी
सीबीआयच्या तपासात काही माहिती समोर आल्यानंतर सीबीआयच्या तपास पथकाने आता आरोपींची आणखी दोन दिवसांसाठी कोठडी वाढून मागितली. मात्र, न्यायालयाने जलील पठाण यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी संजय जाधव यास दोन दिवस वाढीव पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संजय जाधव आणि गंगाधर यांचे थेट व्यवहार झाले आहेत. पुढील तपास करण्यासाठी संजय जाधव आणि गंगाधर यांचे एकत्रित तपास आवश्यक असल्याचं कारण देत सीबीआयने दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढवून मागितली होती. त्यानुसार, न्यायालयाने संजय जाधव यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (NEET Exam)
हेही पाहा –