कुलगाममध्ये शनिवारी (०६ जुलै) सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. या भागात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला. तर दुसरीकडे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत कुलगाम जिल्ह्यात लष्करी जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा (Four terrorists killed) केला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा डिव्हिजन कमांडर फारुख नल्ली (Divisional Commander of Hizbul Mujahideen Farooq Nalli) याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. (Kulgam Encounter)
(हेही वाचा – Adani Gas Share Price : सेबीच्या हिंडेनबर्ग नोटिशीनंतर अदानी समुहाचे शेअर ४ टक्क्यांनी वाढले)
सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. कुलगाममधील पहिल्या चकमकीनंतर काही तासांनी जिल्ह्यातील आणखी एका फ्रिसाल गावातील (Frisal village) चिंगम भागात चकमक सुरू झाली. या परिसरात लष्कराचे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई केली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) या दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक झाल्याची माहिती दिली होती. (Kulgam Encounter)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community