Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथाच्या रथयात्रेची गोष्ट जाणून घ्या; अद्भुत आहे भगवंताची लीला…

207
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथाच्या रथयात्रेची गोष्ट जाणून घ्या; अद्भुत आहे भगवंताची लीला...
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथाच्या रथयात्रेची गोष्ट जाणून घ्या; अद्भुत आहे भगवंताची लीला...

आज ७ जुलै २०२४ (आषाढ शुक्ल पक्ष) म्हणजेच रथयात्रेचा दिवस. चला तर भगवंताच्या रथयात्रेबद्दल काही तथ्ये जाणून घेऊया (Jagannath Rath Yatra 2024)

(हेही वाचा- IND vs ZIM 1st T20 Match: टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ठरली अपयशी!)

रथयात्रेची गोष्ट – कशी झाली देवाची मूर्ती तयार?

असं म्हटलं जातं की, ओडीसा इथल्या निलांचल सागर जवळ राजा इंद्रद्युम्न आपल्या कुटुंबासोबत राहत होता. एक दिवस त्याने समुद्रात एक प्रचंड लाकूड पाहिलं असं म्हणतात. राजाने ठरवलं की, या लाकडाच्या ओंडक्याची एक विष्णुमूर्ती तयार करवुन घ्यायला हवी. (Jagannath Rath Yatra 2024)

विश्वकर्मा अवतरले

राजाचा हा निर्णय समजताच प्रभू विश्वकर्मा यांनी एका वृद्ध सुताराचं रूप धारण केलं. मूर्ती तयार करण्यासाठी त्यांनी राजाला एक अट घातली होती की, मूर्ती पूर्ण होईपर्यंत ज्या घरात मूर्ती बनवणार आहे तिथे कोणीही येऊ नये. राजाने ती अट मान्य केली. (Jagannath Rath Yatra 2024)

(हेही वाचा- Building Collapses In Surat: सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!)

मंदिराच्या ठिकाणीच मूर्तींची निर्मिती

ज्या ठिकाणी भगवान जगन्नाथाचे मंदिर आहे त्याच्या जवळच एका घरात त्यांनी मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. म्हातारा सुतार कोण होता हे राजाला आणि राजाच्या घरच्यांना माहीत नव्हतं. कित्येक दिवस त्या घराचे दार बंद होते. सुतार खाण्या-पिण्याशिवाय काम कसं काय पूर्ण करणार? असा प्रश्न राणीला पडला. आतापर्यंत तर तो सुतार मेला असेल. राणीने महाराजांना तिला वाटणाऱ्या संशयाची माहिती दिली. तेव्हा महाराजांनी दरवाजा उघडून पाहिलं. त्यांना म्हातारा सुतार कुठेच दिसला नाही पण त्यांनी तयार केलेल्या श्री जगन्नाथ, सुभद्रा आणि बलरामाच्या अर्ध्या तयार असलेल्या लाकडी मूर्ती सापडल्या. (Jagannath Rath Yatra 2024)

विश्वकर्मा कुठे गेले?

महाराज आणि राणी यांना खूप वाईट वाटलं. पण त्याच क्षणी दोघांनाही आकाशातून एक आवाज ऐकू आला. ‘व्यर्थ दुःखी होऊ नकोस, आम्हाला याच रूपात राहायचं आहे. मूर्तींना द्रवाने शुद्ध करून त्यांची प्रतिष्ठापना करा.’
आजच्या काळातही त्या अपूर्ण आणि अस्पष्ट मूर्ती पुरुषोत्तम पुरीच्या रथयात्रेत आणि मंदिरात शोभत आहेत. तसंच पूजनीयही आहेत. (Jagannath Rath Yatra 2024)

(हेही वाचा- मलिकांना सोबत घेवू नका; VHP चे Ajit Pawar यांना आवाहन)

सुभद्राची रथ यात्रा

असं म्हटलं जातं की, माता सुभद्राची द्वारकेला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम यांनी वेगवेगळ्या रथात बसून रथयात्रा काढली होती. ही रथयात्रा दरवर्षी माता सुभद्रा यांच्या शहरात आलेल्या भेटीच्या स्मरणार्थ दरवर्षी पुरीमध्ये निघते. (Jagannath Rath Yatra 2024)

रथ यात्रेचे अध्यात्मिक महत्व

भारतातल्या ओडीसा राज्यातल्या पुरी जिल्हा ही भगवान जगन्नाथ यांची मुख्य लीला भूमी आहे असं म्हटलं जातं. तसंच या प्रदेशाला पुरुषोत्तम पुरी, शंख क्षेत्र आणि श्री क्षेत्र या नावानेही ओळखलं जातं. (Jagannath Rath Yatra 2024)

(हेही वाचा- Crime News : अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब स्फोट की आणखी काही? तुरुंगात एकच खळबळ)

जगन्नाथ हे उत्कल राज्याचे प्रमुख देव आहेत. जगन्नाथ हे राधा आणि कृष्णाच्या युगलरूपाचं प्रतीक आहेत. आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षातल्या द्वितीयेच्या दिवशी जगन्नाथपुरी येथून भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा सुरू होते. भगवान जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडतात आणि जगाचे कल्याण करतात अशी मान्यता आहे. (Jagannath Rath Yatra 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.