Konkan Railway: मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी; कोकण रेल्वे ठप्प

408
Konkan Railway: मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी; कोकण रेल्वे ठप्प

नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पाणी साचण्यास सुरवात (Konkan Railway) झाली आहे. आदई, सुकापूर भागातील गावात पाणी भरु लागले आहे. रस्त्यावर, सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पनवेल आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात पाणी घुसले आहे. कार, परिवहन बस बंद पडल्या आहेत. शिवाय, याच पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वेवर (Konkan Railway) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस रखडली

नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात सध्या मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या रखडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस रखडली आहे. आटगाव वाशिंद दरम्यान ट्रॅकवर झाड पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे खडवली स्टेशन दरम्यान रेल्वेट्रॅकवरील खडी व माती वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. (Konkan Railway)

कार, परिवहन बस बंद

कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या अप साईडच्या गाड्या पूर्णपणे विस्कळीत असून स्थानकादरम्यान अनेक एक्सप्रेस व ट्रेन एकामागे एक उभ्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या वसई दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कळंबोली भागात पुराचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गाड्या अडकल्या आहेत. कार, परिवहन बस बंद पडल्या आहेत. रहिवाशांचे हाल होत आहेत. (Konkan Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.